बलात्काऱ्याला वाचवण्यासाठी ठाकरे सरकारचं हम साथ-साथ है: चित्रा वाघ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: पुणे: पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज (25 फेब्रुवारी) पुण्यात जाऊन घटनास्थळाची पाहणी केली तसेच वानवडी पोलीस स्थानकात जाऊन घटनेविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत चित्रा वाघ या अत्यंत संतापलेल्या दिसून आल्या. ‘बलात्काऱ्याला वाचवण्यासाठी ठाकरे सरकारचं हम साथ-साथ है.’ असा गंभीर आरोप यावेळी चित्रा वाघ यांनी केला.

ADVERTISEMENT

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये वनमंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही यावेळी चित्रा वाघ यांनी केली आहे.

चित्रा वाघ यांनी संजय राठोडांवर केला हल्लाबोल, पाहा ही पत्रकार परिषद

हे वाचलं का?

पत्रकार परिषदेआधी पोलीस स्टेशनमध्ये काय घडलं?

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी चित्रा वाघ या जेव्हा वानवडी पोलिसांना भेटून बाहेर आल्या तेव्हा त्या प्रचंड संतापलेल्या दिसून आल्या. याबाबत जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तेव्हा त्या म्हणाल्या की, ‘हे प्रकरण दडपण्यासाठीच पोलीस निरीक्षक लगड यांना बसवलं आहे. एवढ्या मग्रुरीने बोलणारा पोलीस अधिकारी मी माझ्या सार्वजनिक आयुष्यात कधीही पाहिला नाही. या प्रकरणी काहीही करायचं नाही अशी भूमिका पुणे पोलिसांनी घेतली आहे. लगड असे बोलत होते की, जसे त्यांचा प्रोटेक्टर कोणी तरी आहे. लगड यांचे हावभाव असे होते की, तू काय करायचे ते कर, माझं तू काहीही वाकडं करु शकत नाही.’ असं म्हणत चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला.

ADVERTISEMENT

ही बातमी पण पाहिलीत का?: संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा-चित्रा वाघ

ADVERTISEMENT

ठाकरे सरकारावर जोरदार टीका

’17 दिवसानंतर देखील पूजा चव्हाणच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा का नोंदवला गेला नाही? संजय राठोड हे 15 दिवस कुठे तोंड लपवून बसले होते? जेव्हा पूजा चव्हाण प्रकरण समोर आलं तेव्हा गृहमंत्र्यांना कोरोना झाला होता त्यांना आपण सोडून देऊयात पण राज्याला दोन गृहराज्यमंत्री आहेत ते काय करत होते याप्रकरणी? अहो बलात्काऱ्याला वाचविण्यासाठी इथे एक व्यक्ती नाही सरकारमधील सगळे हम साथ-साथ है.’ असं म्हणत चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर देखील जोरदार टीका केली आहे.

‘पूजा चव्हाणच्या मृत्यू नेमका कसा झाला?’

‘पूजा चव्हाण ज्या फ्लॅटमध्ये राहत तो फ्लॅट सध्या सील करण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही वरच्या फ्लॅटवर जाऊन पाहणी केली. यावेळी ग्रिलची देखील पाहणी केली. ही ग्रिल खूपच उंच होती. त्यामुळे पूजा चव्हाण ही तिथून खाली पडली की तिला खाली ढकलण्यात आलं? याचा देखील तपास झाला पाहिजे. मला वाटतं पुणे पोलिसांवर प्रचंड दबाव आहे. त्यामुळे त्यांच्याकडून या प्रकरणाचा तपास काढून घेऊन एखाद्या सक्षम आयपीएस अधिकाऱ्याकडे देण्यात यावा.

चित्रा वाघ यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:

  • संजय राठोड यांच्या चौकशीशिवाय अहवालाला महत्त्व नाही.

  • पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून काढून घ्या, एका चांगल्या आयपीएस अधिकाऱ्याकडे तपास सोपवा

  • पूर्णपणे पोलीस प्रशासन दावणीला बांधलं गेलं आहे.

  • संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

  • मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतरही दौरा करुन संजय राठोड यांनी कोरोना पसरवण्याचं काम केलं.

  • संजय राठोड 15 दिवस कुठे तोंड लपवून बसले होते.

  • गृहमंत्र्यांना कोरोना झाला होता त्यांना आपण सोडून देऊयात पण दोन गृहराज्यमंत्री आहेत ते काय करत होते?

  • बलात्काऱ्याला वाचविण्यासाठी इथे सगळे हम साथ-साथ है

  • बारा ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. त्याचा तपास का होत नाही?

    ह्या घटनेबाबतचे जे फोन कॉल्सचे रेकॉर्ड आहेत ते सर्व पोलिसांनी सार्वजनिक केले पाहिजे.

  • यवतमाळमध्ये जिथे पूजा गर्भपातासाठी गेली होती ज्या डॉक्टरची तिथे ड्युटी होती तो डॉक्टर ड्यूटीवर आलाच नाही त्याच्या जागी दुसराच डॉक्टर आला होता.

  • पुणे पोलिसांची टीम यवतमाळला गेली होती पण तपास काय केला हे माहित नाही.

  • सुमोटोद्वारे पुणे पोलीस गुन्हा दाखल का करत नाही?

  • स्वत: शेण खायचं आणि राज्याला वेठीला धरायचं असा हा प्रकार आहे.

  • आज MVA चे तीनही पक्ष बघा कसे कसून प्रयत्न करत आहेत आपल्या बलात्कारल्या वाचवण्यासाठी आतोनात प्रयत्न करीत आहेत. पण भंडाऱ्याला जे अग्निकांड झाले त्या 10 नवजात बालकांना न्याय देण्यासाठी एकत्रित आले नाही.

  • मला असे वाटते की राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील आहेत. त्यांनी संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन एक उदाहरण सर्वांसमोर ठेवलं पाहिजे.

  • इथे न्याय मिळाला नाही तर न्यायालयाचे दरवाजे खुले आहेत. आम्ही शक्य ते प्रयत्न करुन पूजाला न्याय मिळवून देऊ.

  • ऑडियो क्लिप्स बाहेर आल्यावर पूर्ण प्रकरण बाहेर आलं. तोपर्यंत ना तुम्हाला माहित होतं ना आम्हला माहित होतं की, पूजा प्रकरण नेमकं काय आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT