पंचनामे होत राहतील आधी शेतकऱ्यांना मदत करा, देवेंद्र फडणवीस यांची मागणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे होत राहतील आधी त्यांना मदत करणं जास्त गरजेचं तातडीचा दिलासा द्या, बाकी सगळ्या गोष्टी नंतर होतील असंही फडणवीस म्हणाले. भाजपचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले। यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या शेतातील पिकाची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या.

ADVERTISEMENT

गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे शेतातील पिकांचं मोठं नुकसान झालं. काही भागात तर संपूर्ण पिकांचं उद्धवस्त झाले. या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणलं. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला. तरी सुद्धा शेतकऱ्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

नुकसानीमुळे खचलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आज माजी मुख्यमंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांचा नापिकीच्या प्रश्न उचलून मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याच सांगितलं. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील सोयाबीन आणि कापसाची झाड दाखवून देवेंद्र फडणवीस यांच लक्ष वेधून घेतलं.

हे वाचलं का?

राज्यात आतापर्यंत ज्या ज्या आपत्ती आल्या, त्यावेळी केलेल्या सर्व घोषणा हवेत विरल्या आहेत. कोणत्याही घोषणेची पूर्तता झाली नाही. कागदावरच घोषणा राहिल्या. ही वास्तविकता आहे. आमच्या सरकारने जो जीआर काढला होता. तशीच मदत देऊ असं त्यांनी सांगितलं होतं. पण ती मदतही त्यांनी अद्याप दिलेली नाही, असंही त्यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी कोस्टल रोडचा आराखडा मंजूर झाल्याने समाधान व्यक्त केलं. कोस्टल रोडचा आराखडा मंजूर झाला हे चांगलं झालं. आमचं सरकार असताना आम्ही हा आराखडा तयार केला होता. मी स्वत: कोस्टल रोडसाठी प्रयत्न केला होता. कोस्टल रोडमुळे सिडकोमधील अनेक प्रकल्प मार्गी लागतील असंही त्यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

फडणवीस यांनी या आधी तीन ट्विट करून सरकारडे पूरग्रस्तांना मदत देण्याची मागणी केली होती. राज्यात विशेषत: मराठवाड्यात पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. लाखो हेक्टरवर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकर्‍यांना तत्काळ मदत दिली पाहिजे. निसर्ग, तौक्ते ही दोन चक्रीवादळं आणि पुराची कोकणात अजून मदत मिळाली नाही. अशात मराठवाड्यासंदर्भात जी माहिती राज्य सरकारनेच दिली, ती अतिशय धक्कादायक आहे. यंदाच्या पावसाळ्यात 436 लोकांना आपले प्राण गमवावे लागले, यातूनच या स्थितीची भीषणता लक्षात येते. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहे, असं ते म्हणाले होते.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT