अनिल परब यांचं वादग्रस्त रिसॉर्ट पाडण्यात येणार का? काय म्हणाले किरीट सोमय्या?
शिवसेना नेते आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. अनिल परब यांचा रत्नागिरी येथील रिसॉर्ट पाडण्यात येणार असल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे. अनधिकृत बांधकाम पाडण्याचा केंद्रासह महाराष्ट्र पर्यावरण विभागानं देखील आदेश दिल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे. तसंच अनिल परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील […]
ADVERTISEMENT

शिवसेना नेते आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. अनिल परब यांचा रत्नागिरी येथील रिसॉर्ट पाडण्यात येणार असल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे. अनधिकृत बांधकाम पाडण्याचा केंद्रासह महाराष्ट्र पर्यावरण विभागानं देखील आदेश दिल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे. तसंच अनिल परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील आपण केल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे.
परब यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार – सोमय्या
उद्धव ठाकरे यांचे जवळचे मानले जाणारे अनिल परब यांच्या अनधिकृत रिसॉर्टवर हातोडा पडणार आहे. किरीट सोमय्या यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. केंद्र आणि राज्याचं आदेश उद्या मंगळवारी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात येणार आणि रिसॉर्ट पडलं जाणार असल्याचं ते म्हणाले. अनिल परब हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर केल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री आणि उप-मुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले.
यापूर्वी ट्विट करून दिले होते संकेत