पंकजा मुंडेंनी तयार केलेल्या ‘PM’ चहाची सोशल मीडियावर फक्कड चर्चा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्याप्रमाणेच सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून त्यांच्याशी एकरूप होण्याची किमया भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यातही आहे. आज पुन्हा एकदा त्यांच्या याच वृत्तीचा परिचय झाला. एका छोट्या हॉटेलमध्ये पंकजा मुंडे यांनी आपल्या हाताने चहा बनवला. औरंगाबाद-बीड राष्ट्रीय महामार्गावरच्या एका छोट्या हॉटेलमध्ये त्यांनी चहा बनवला आणि त्यानंतर मिसळ पावाचा आस्वादही घेतला. पंकजा मुंडे यांनी चहा तयार केल्याची चर्चा रंगली आहे. पंकजा मुंडे यांनी तयार केलेल्या चहाला PM चहा असं सोशल मीडियावर म्हटलं जातं आहे. या चहाची फक्कड चर्चा रंगली आहे.

ADVERTISEMENT

पंकजा मुंडे यांच्या हातच्या पीएम चहाची चर्चा

सोशल मीडियावर पंकजा मुंडे यांचा चहा तयार करतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. चिंते पिंपळगाव या ठिकाणच्या देवगिरी नाश्ता सेंटर या ठिकाणी त्या थांबल्या होत्या. इथली मिसळ खाऊन पाहा असा आग्रह मला गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्ते करत होते. त्यामुळे मी थांबले असं पंकजा मुंडेंनी सांगितलं. तसंच तिथे गॅस पाहून त्यांनी चहा तयार करण्याची इच्छाही दर्शवली.

माझ्या हातचा PM चहा पिऊन पाहा असंही म्हणाल्या पंकजा मुंडे

पंकजा मुंडे यांनी गॅसवर चहा ठेवला आणि माझ्या हातचापीएम चहा म्हणजेच पंकजा मुंडे चहा पिऊन पाहा असं पंकजा मुंडे कार्यकर्त्यांना म्हणाल्या. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी चहा पावडर, वेलची आणि सुंठ टाकून एकदम फक्कड चहा तयार केला.

हे वाचलं का?

मला स्ट्राँग चहा नेहमीच आवडतो

मला स्ट्राँग चहा नेहमीच आवडतो असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. राजकारण आणि चहा यांचं नातं वेगळं आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडल्या तर चहा चांगला होतो तसंच राजकारणातही असतं. असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. तसंच माझ्या वाट्याला जे काही येईल ते मी घेत असते असं म्हणत राजकारणाता आपला अनुभव त्यांनी वेगळ्या पद्धतीने सांगितला. तसंच गोपीनाथ मुंडे यांना चिकन आणि मटण अनेकदा बनवून दिलं आहे त्यांना ते आवडतं. त्यांनाही माझ्या हातचा चहा आवडत होता. भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही माझ्या हातचा चहा प्यायला आहे ते मला कधीच नावं ठेवणार नाही असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजाताई मुंडे आज सकाळी औरंगाबादहून बीडला जाण्यासाठी निघाल्या असता बीड हायवेवर रस्त्यात असलेल्या हॉटेल देवगिरीसमोर वाहनांचा ताफा थांबला. पंकजाताईंना पाहतात हॉटेल चालक दीपक शिंदे यांनी त्यांचं स्वागत केलं. हॉटेल चालकाच्या आग्रहानंतर पंकजा मुंडे यांनी या ठिकाणी मिसळ पाव आणि पोहे यांचाही आस्वाद घेतला. एवढंच नाही तर त्यांनी जो चहा बनवला त्याचीही चर्चा रंगली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT