Pankaja Munde: पंकजा मुंडेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट?
नवी दिल्ली: भाजप (BJP) नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या दिल्ली (Delhi) दौऱ्यामुळे महाराष्ट्रात (Maharashtra) मात्र वेगवेगळ्या चर्चांना बरंच उधाण आलं आहे. त्यातच आता अशीही माहिती समोर येत आहे की, पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचीही भेट घेतली आहे. यामुळे आता यामुळे महाराष्ट्र भाजपमध्ये नेमके काही बदल होणार का? […]
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: भाजप (BJP) नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या दिल्ली (Delhi) दौऱ्यामुळे महाराष्ट्रात (Maharashtra) मात्र वेगवेगळ्या चर्चांना बरंच उधाण आलं आहे. त्यातच आता अशीही माहिती समोर येत आहे की, पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचीही भेट घेतली आहे. यामुळे आता यामुळे महाराष्ट्र भाजपमध्ये नेमके काही बदल होणार का? याविषयी चर्चा रंगू लागली आहे.
एकीकडे पंकजा मुंडे दिल्लीत दाखल झाल्याने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मात्र वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातही एक चर्चा अशी आहे की, पंकजा मुंडे यांना महाराष्ट्रात पक्षीय पातळीवर अत्यंत मोठी जबाबदारी मिळू शकते.
मागील काही वर्षांपासून राज्यातील भाजपच्या नेतृत्वाकडून मुंडे कुटुंबीयांना डावललं जात असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तार देखील प्रीतम मुंडे यांना स्थान देण्यात न आल्याने बीडमधील अनेक भाजप पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे देणं सुरु केलं आहे. या सगळ्या घडामोडी दरम्यान पंकजा मुंडे यांच्या दिल्ली दौऱ्याला फारच महत्त्व आलं आहे.
नुकताच मोदींच्या मंत्रिमंडळात अनेक फेरबदल करण्यात आले आहेत. त्यानंतर रविवारी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजपच्या सर्व राष्ट्रीय सचिवांची बैठकीचं दिल्लीत आयोजन केलं होतं. याच बैठकीसाठी पंकजा मुंडे या देखील दिल्लीत गेल्या आहेत. पण याच बैठकीच्या निमित्ताने पंकजा मुंडे या आपली नाराजी केंद्रीय नेतृत्वाकडे व्यक्त करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.