महाराष्ट्रातील ‘या’ मतांवर भाजपचा डोळा? विनोद तावडेंनी सांगितलं गणित

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Bjp Maharashtra state executive meeting in Nashik : भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक नाशिकमध्ये शनिवारपासून सुरू झाली. महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा निवडणूक, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. आगामी निवडणुकीबद्दल स्ट्रॅटजीबद्दल बैठकीत चर्चा होणार असून, भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी मतांचं गणित माडलं. (Vinod Tawade in Bjp Maharashtra state executive meeting in Nashik)

ADVERTISEMENT

2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबरोबरच भाजपनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपनं लोकसभेत यश मिळवण्यासाठी मिशन 144 निश्चित केलं आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीतही 200 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. यावर नाशिकमध्ये होत असलेल्या बैठकीत मंथन सुरू आहे.

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा कोणत्या मतांवर डोळा?

नाशिकमध्ये बोलताना भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी मतांचं गणित मांडलं. विनोद तावडे म्हणाले, “2014 ला सगळे पक्ष वेगळे लढले तेव्हा भाजपला 28 टक्के, शिवसेनेला 19 टक्के, काँग्रेसला 18 टक्के, राष्ट्रवादी काँग्रेसला 17 टक्के अशी मतं पडली होती.”

हे वाचलं का?

BJP : फडणवीस-मुंडेंचा एकाच गाडीतून प्रवास; काय कारण?

यावेळी तावडेंनी सांगितलं की, “शिवसेना राम मंदिराला विरोध करणाऱ्या पक्षांसोबत जाऊन एकत्र सत्तेत बसली. त्यानंतर बाळासाहेबांमुळे हिंदुत्वाची मतं काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गेली, पण त्यातील दुखावलेली हिंदू मतं अस्थिर झाली. तिच मतं आपल्याकडे वळवण्यावर आमचं लक्ष्य असेल.”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीब कल्याणाचे विषय मार्गी लावतायेत त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची पारंपरिक मतं आमच्याकडे वाळतायेत. अशाच पद्धतीने आमची मतं 28 वरून 45 ते 50 टक्क्यांवर घेऊन जाण्याचा आमचा निर्धार आहे”, असं विनोद तावडे म्हणाले.

ADVERTISEMENT

Kasba Peth : ब्राह्मण समाज कोणाला करणार मतदान? निर्णय झाला; कसब्यात बॅनर्स

ADVERTISEMENT

लोकसभा प्रवास योजना, भाजपची 2024 साठी रणनीती

लोकसभा, विधानसभा निवडणुका 2024 मध्ये होत असून, भाजपनं आतापासूनच वरपासून खालपर्यंत पक्षबांधणी सुरू केलीये. लोकसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी भाजपनं गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत केलं आहे.

या मतदारसंघांच्या अनुषंगाने भाजपनं लोकसभा प्रवास योजना सुरू केलीये. केंद्रीय मंत्री या लोकसभा मतदारसंघात जाऊन मोर्चेबांधणी करत आहे. यात महाराष्ट्रातील 16 लोकसभा मतदारसंघांचा यात समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी खास स्ट्रॅटजी…

विधानसभा निवडणुकीत 200 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा भाजपचा निर्धार आहे. या अनुषंगाने भाजपने राज्यसभा खासदार व विधान परिषद आमदारांचा निधी पक्ष सांगेल त्या ठिकाणी खर्च करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. येत्या 2024 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

‘मोदीजी तुमच्याजवळही चिखलच होता आणि तोच..’, PM मोदींना कोणी सुनावलं?

राज्यसभा खासदार व विधान परिषदेच्या आमदारांना निधी मिळतो, हा वार्षिक निधी आता पक्षाच्या माध्यमातून खर्च करण्याचा निर्णय महाराष्ट्र भाजपनं घेतला आहे. ज्या विधानसभा मतदारसंघात भाजपचा आमदार नाही, त्या भागात विशेष लक्ष्य देण्यासाठी असा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जातं.

राज्यसभा खासदार व विधान परिषदेच्या आमदारांना प्रत्येकी वर्षाला 5 कोटी इतका निधी दिला जातो. आता हा निधी पक्षाच्या आदेशावरुन खर्च करण्यात येणार आहे. काही मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार थोड्या फरकाने पराभूत झाले. तर त्या मतदारसंघांकडे विशेष लक्ष देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचंही सांगितलं जातं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT