भाजप अल्पसंख्याक मोर्च्याच्या राष्ट्रीय अध्यक्षाला जिवे मारण्याची धमकी

मुंबई तक

भाजपच्या अल्पसंख्याक मोर्च्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकीचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या नागपूरच्या कार्यलयात हे धमकीचे पत्र सापडले आहे. ज्यामध्ये शीर धडापासून वेगळं करण्याची धमकी देण्यात आली आहे. तसंच या बंदपत्रात दोन फोटो देखील आढळून आले आहेत. ज्यामध्ये सिद्दीकी आरएसएसच्या कार्यक्रमात असल्याचे पाहायला मिळतात. याप्रकरणी सिद्दीकी […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

भाजपच्या अल्पसंख्याक मोर्च्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकीचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या नागपूरच्या कार्यलयात हे धमकीचे पत्र सापडले आहे. ज्यामध्ये शीर धडापासून वेगळं करण्याची धमकी देण्यात आली आहे. तसंच या बंदपत्रात दोन फोटो देखील आढळून आले आहेत. ज्यामध्ये सिद्दीकी आरएसएसच्या कार्यक्रमात असल्याचे पाहायला मिळतात. याप्रकरणी सिद्दीकी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी जमाल सिद्दीकी आरएसएसच्या गुरु पूजन कार्यक्रमात सहभाही झाले होते. त्याच कार्यक्रमाचे फोटो धमकीच्या पत्रासोबत आढळून आले आहे. यामुळं कट्टरवाद्यांनी त्यांना धमकीचे पत्र पाठ्वल्याच बोललं जात आहे. “रसूल ए पाक की शान में खता सर तन से जुदा ” असा मजकूर लिहलेलं आहे. याची तक्रार जमाल सिद्दीकी यांनी नागपूरच्या सक्करधरा पोलीस स्टेशन पोलीस स्थानकात केली आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत. नेमकं हे पत्र कोणी पाठवलंय, याचा शोध ते घेत आहेत.

काय लिहलंय तक्रारीत?

जमाल सिद्दीकी यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की, माझे सचिव प्रशांत सौदागर कामानिमित्त माझ्या ऑफिसमध्ये गेले असता त्यांना गेटजवळ एक बंदपाकीट सापडलं. पाकीट फाडून त्यांनी पाहिलं असता त्यात धमकीचे पत्र आणि RSS च्या कार्यक्रमाचे दोन फोटो आढळून आले. सचिव प्रशांत यांनी लागलीच फोनवरून याची मला कल्पना दिली. मी त्याला सक्करधरा पोलिसात तक्रार द्यायला सांगितलं, असं नमूद तक्रारीत जमाल सिद्दीकी यांनी लिहलं आहे.

धमकीच्या पत्रात नेमकं काय लिहलंय?

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांना जीवे मारण्याच्या धमकीच्या पत्रात हिंदीत लिहलंय की, “रसूल ए पाक के शान मे खता, सर तण से जुदा. ये जमाल सिद्दीकी आरएसएस के दलाल तुने इस्लाम को बदनाम किया है. इस कार्यक्रम मे जाके गैरमुस्लिम होगया है. इस्लाम को बदनाम करा है. मुस्लिम कौम से गद्दारी की सजा, सर तन से जुदा.” असं पत्रात लिहलं आहे. तसंच दोन फोटो देखील पाठवले आहेत. यावर बोलताना जमाल सिद्दीकी म्हणाले अशा धमकींना मी घाबरणारा नाही. भाजपसह देश आणि समाज हितासाठी काम करत राहणार असल्याचं ते म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp