Ganesh Chaturthi 2024: यंदा कधी आहे गणेश चतुर्थी? जाणून घ्या तिथी, पूजेचा मुहूर्त

मुंबई तक

Ganesh Chaturthi 2024 : हिंदू धर्मात गणरायाला एक विशेष महत्त्व आणि स्थान आहे. हिंदू धर्मग्रंथांनुसार, भगवान गणेशाला प्रथम पूजनीय मानले जाते. त्याच्या पूजेशिवाय कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात होत नाही. गणरायाला चतुर्थी तिथी समर्पित आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गणेश चतुर्थी 2024 तिथी आणि  शुभ मुहूर्त

point

गणेश चतुर्थी शुभ योग

point

गणेश चतुर्थी पूजाविधी सर्वकाही जाणून घ्या...

Ganesh Chaturthi 2024 : हिंदू धर्मात गणरायाला एक विशेष महत्त्व आणि स्थान आहे. हिंदू धर्मग्रंथांनुसार, भगवान गणेशाला प्रथम पूजनीय मानले जाते. त्याच्या पूजेशिवाय कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात होत नाही. गणरायाला चतुर्थी तिथी समर्पित आहे. अशाप्रकारे वर्षभरात 24 चतुर्थी येतात. यामधील गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. ही चतुर्थी गणपती बाप्पाचा जन्म दिवस म्हणून साजरी केली जाते. बाप्पाचे त्याचे भक्त जल्लोषात स्वागत करतात आणि 11 दिवस त्याचा थाटात पाहुणचार करतात. यंदा ही गणेश चतुर्थी कधी आहे, शुभ मुहूर्त काय आहे? हे सर्व आपण या बातमीतून जाणून घेऊयात. (Ganesh Chaturthi 2024 When is Ganesh Chaturthi this year Know the date time muhurat step by step vidhi toperform)

धार्मिक मान्यतेनुसार, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात गणेश चतुर्थी असते. या चतुर्थीपासून पुढील 11 दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. दरवर्षी या शुभ प्रसंगी अनेकांच्या घरी आणि मंडळांमध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तींची स्थापना केली जाते. गणपती बाप्पाची पूजा केल्याने सर्व दु:ख दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. 

हेही वाचा : Ajit Pawar : "...म्हणून मी गुलाबी जॅकेट घालायला लागलो", अजित पवारांनी सांगितलं कारण

गणेश चतुर्थी 2024 तिथी आणि  शुभ मुहूर्त

दिनदर्शिकेनुसार, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजून 31 मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजून 37 मिनिटांनी समाप्त होईल. हिंदू धर्मात उदय तिथीला महत्त्व आहे. 

हेही वाचा : Nepal Plane Crash: काठमांडूत भयंकर अपघात! उड्डाण करताच कोसळले विमान अन्...

 

गणेश चतुर्थी शुभ योग

यावर्षी गणेश चतुर्थीला दुर्मिळ ब्रह्म आणि इंद्र योगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत. ब्रह्मयोग रात्री 11.17 पर्यंत आहे. यानंतर इंद्र योग तयार होत आहे. या दिवशी भाद्रवशीचाही योगायोग आहे. गणेश चतुर्थीला भाद्र पाताळात राहील. याशिवाय गणेश चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योग आणि रवियोगही तयार होत आहेत. एकूणच गणेश चतुर्थीला अनेक दुर्मिळ आणि शुभ घटना घडत असतात.

हे वाचलं का?

    follow whatsapp