नियम फक्त सामान्यांसाठी ! भाजप आमदाराच्या मुलीच्या हळदीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
कोरोनाची साखळी मोडण्यासाठी राज्य शासनाने सामान्यांना अनेक निर्बंध घातले आहेत. यात लग्न आणि इतर सोहळ्यांसाठी फक्त २५ माणसं आणि दोन तासांची मुदत देण्यात आली आहे. परंतू हे नियम राजकीय नेत्यांना लागू होत नाहीत असंच चित्र महाराष्ट्रात दिसतंय. भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्या मुलीच्या हळद आणि संगीत कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांचा फज्जा उडालेला […]
ADVERTISEMENT
कोरोनाची साखळी मोडण्यासाठी राज्य शासनाने सामान्यांना अनेक निर्बंध घातले आहेत. यात लग्न आणि इतर सोहळ्यांसाठी फक्त २५ माणसं आणि दोन तासांची मुदत देण्यात आली आहे. परंतू हे नियम राजकीय नेत्यांना लागू होत नाहीत असंच चित्र महाराष्ट्रात दिसतंय. भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्या मुलीच्या हळद आणि संगीत कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांचा फज्जा उडालेला पहायला मिळाला.
ADVERTISEMENT
आमदार लांडगे यांची मुलगी साक्षी हिचं येत्या ६ जूनला लग्न होणार आहे. या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. लग्नासाठी घातलेल्या मंडपात नुकतास हळद आणि संगीत सोहळा पार पडला. परंतू या कार्यक्रमात खुद्द आमदार लांडगेंनी कोरोना आणि सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम धाब्यावर बसवत सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाच्या नियम आणि निर्बंधांबद्दल प्रश्न विचारला जात आहे.
हे वाचलं का?
एरवी सामान्य जनतेला नियम आणि निर्बंधांची आठवण करुन देणारे पोलीस आणि सरकारी अधिकारी या ठिकाणी फिरकले देखील नाहीत. या सोहळ्याला शेकडोंची गर्दी जमली होती. डान्स, भंडारा उधळत झालेल्या या सेलिब्रेशनमध्ये कोणत्याही व्यक्तीने मास्क घातल्याचं पहायला मिळालं नाही. त्यामुळे लोकप्रतिनीधीच जर अशाप्रकारे नियमांचं सर्रास उल्लंघन करणार असतील तर सामान्य जनतेने नियम मोडले तर कारवाई का असा सवाल आता लोकांकडून विचारला जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT