आमदार नितेश राणेंची प्रकृती बिघडली, कोल्हापूरच्या रुग्णालयात करणार दाखल

मुंबई तक

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेले भाजप आमदार नितेश राणे यांची तब्येत बिघडली आहे. यानंतर त्यांना कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. नितेश राणे यांच्या छातीत दुखत असल्याची माहिती मिळते आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळल्यानंतर ते न्यायालयाला शरण आले होते. राणेंना न्यायालयीन कोठडीत आणल्यानंतर त्यांना कणकवलीवरुन […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेले भाजप आमदार नितेश राणे यांची तब्येत बिघडली आहे. यानंतर त्यांना कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. नितेश राणे यांच्या छातीत दुखत असल्याची माहिती मिळते आहे.

जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळल्यानंतर ते न्यायालयाला शरण आले होते. राणेंना न्यायालयीन कोठडीत आणल्यानंतर त्यांना कणकवलीवरुन ओरोस जिल्हा रुग्णालयात आणलं होतं. यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. नितेश राणेंचा रक्तदाब वाढल्यामुळे त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. परंतू ओरोसमध्ये कार्डियाक सिस्टीम उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कोल्हापूर येथे दाखल करुन तपासणी केली जाणार आहे.

पेडवे मेडीकल कॉलेजचे डीन डॉक्टर कुलकर्णी हे जिल्हा रुग्णालयात दाखल झाले असून ते डॉक्टरांशी महत्वपूर्ण चर्चा करत असल्याचं कळतंय. अँब्यूलन्सने नितेश राणेंना कोल्हापुरात हलवण्यात येईल. नितेश राणेंच्या जामिनासाठी कालच जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावर आज सुनावणी होणार होती पण सरकारी वकील प्रदीप घरत आज उपलब्ध नसल्याने जामिन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. नितेश राणेंची कालची रात्र सिंधुदुर्ग जिल्हा रूग्णालयात गेली, तर त्यांचे पीए राकेश परब यांची कालची रात्र सावंतवाडी जेलमध्ये गेली.

हे वाचलं का?

    follow whatsapp