हात जोडून माफी मागा तोपर्यंत एकही चित्रपट चालू देणार नाही – Ram Kadam यांचा जावेद अख्तर यांना इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या विधानावरुन आता नवीन वादाला सुरुवात झाली आहे. जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तानात सत्तेत आलेल्या तालिबानवर टीका केली आहे. तालिबानवर टीका करतानाच जावेद अख्तर यांनी भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्यावरही निशाणा साधला. या तिन्ही संघटनांची जावेद अख्तर यांनी तालिबानसोबत तुलना केली आहे.

ADVERTISEMENT

अख्तर यांच्या वक्तव्याचा समाचार घेत असताना भाजप आमदार राम कदम यांनी, अख्तर यांनी हात जोडून विंहीप कार्यकर्त्यांची माफी मागावी. नाहीतर तुमचा एकही चित्रपट या देशात चालू देणार नाही असा इशारा दिला आहे.

तालिबानी रानटी वृत्तीचे असून, त्याची कृत्ये निंदा करावीत अशीच आहेत, याबद्दल कोणतीही शंका नाही. तालिबानचं समर्थन करणाऱ्यांची विधानं मला नक्की आठवत नाही, पण अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीचं स्वागत करणारी होती. मी इतकंच म्हणेन भारतातील मुस्लिम तरुणांना चांगलं काम, चांगलं शिक्षण आणि स्वतःच्या मुलांसाठी चांगली शाळा हवीये. पण, दुसरीकडे असेही लोक आहेत, जे रुढीवादावर विश्वास ठेवतात. महिला व पुरुष यांना वेगवेगळ्या पद्धतीने वागवलं जातं. अशा जुन्या पद्धतीवर विश्वास ठेवणारेही आहेत. तालिबान रानटी वृत्तीची आहे, यात कसलीही शंका नाही. पण, आरएसएस, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांना पाठिंबा देणारे, त्यांचं समर्थन करणारेही तालिबानचं समर्थन करणाऱ्यांसारखेच आहेत. भारत समाजवादी (सेक्युलर) देश आहे. त्यामुळे तालिबानचा विचार कोणत्याही भारतीयाला पटणार नाही. या देशातील जास्त लोक हे सभ्य आणि सहनशील आहेत.

जावेद अख्तर यांचं विधान

हे वाचलं का?

जावेद अख्तर यांना राम कदम यांचं प्रत्युत्तर –

जावेद अख्तर यांचं हे विधान विंहींपच्या कोट्यवधी कार्यकर्त्यांचा आणि त्या विचारधारेला मानणाऱ्या लोकांचा अपमान आहे. जी लोकं स्वतः हातात झाडू घेऊन गरीब वस्त्यांमध्ये जाऊन सफाई आणि इतर सेवा करतात त्या कार्यकर्त्यांचा जावेद अख्तर यांनी अपमान केलाय. वक्तव्य करायच्या आधी किमान हा तरी विचार करायला हवा होता की संघाच्या विचारधारेची माणसं आज या देशात लोकशाहीनुसार देश चालवत आहेत. देशात जर तालिबानसारखी सत्ता असती तर जावेद अख्तर अशी वक्तव्य करु शकले असते? त्यांच्या या वक्तव्याला कोणताही आधार नाही. जोपर्यंत ते हात जोडून संघ कार्यकर्तेंची माफी मागत नाही तोपर्यंत त्यांची कोणतीही फिल्म आम्ही या देशात चालू देणार नाही.

ADVERTISEMENT

त्यामुळे या विधानावरुन निर्माण झालेला वाद आता कुठपर्यंत जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT