ऋतुजा लटके यांच्या विजयाचे खरे शिल्पकार देवेंद्र फडणवीस! अनिल बोंडेंनी सांगितलं कारण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल रविवारी घोषित झाला. यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला. ऋतुजा लटके यांना 66 हजार 247 मतं मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावर ‘नोटा’ ला 12 हजार 776 मतं मिळाली. लटके यांच्या या विजयाचं श्रेय उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक, कार्यकर्ते आणि मतदारांना दिलं आहे.

तर भाजपच्यावतीने हे श्रेय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलं आहे. भाजप नेते व खासदार अनिल बोंडे याबाबत बोलताना म्हणाले, ऋतुजा लटके यांचं खरं तर पहिले अभिनंदन करतो. मात्र त्यांच्या या विजयाचे श्रेय हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना द्यायला हवं. कारण आज जे शिवसैनिक नाचतं आहेत, पेढे वाटत आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे! कारण त्यांनी भाजपचा उमेदवारी अर्ज मागे घेतला, म्हणून ऋतुजा लटके यांचा विजय झाला. जर भाजपचा उमेदवारी अर्ज कायम असता तर आज जे शिवसैनिक नाचत आहेत त्यांचे चेहरे लटकलेले राहले असते, असंही अनिल बोंडे म्हणाले.

विजयानंतर ऋतुजा लटके काय म्हणाल्या?

आज या निवडणुकीत जो विजय झाला तो माझा नसून माझे पती रमेश लटके यांचा विजय आहे, असं मी मानते. रमेश लटके यांनी हयात असताना जी जनसेवा केली, लोकांची कामं मार्गी लावली त्याचंच रूपांतर हे आजच्या विजयात झालं आहे असं मी मानते. मतदारांनी त्याचीच परफेड केली आहे असं मला वाटतं. मी सगळ्या मतदारांचे आभार मानते. लोकांची मला साथ आहे त्यामुळेच मी निवडून आले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने मी निवडून आले, असं म्हणतं ऋतुजा लटके यांनी त्यांचे आभार मानले. भाजपने उमेदवारी मागे घेतली पण नोटा निवडा हे सांगण्यात येत होतं. त्याच्या क्लिप्सही आल्या होत्या. मतदारांनी बऱ्याच प्रमाणात नोटावर मतदान केलं आहे. ते का? याचं कारण हे लोकांना, मतदारांनाच विचारलं पाहिजे असं लटके यांनी म्हटलं आहे.

तरी १२ हजार मत मिळाली असती… :

या विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला. ते म्हणाले, आमचं नाव आणि चिन्ह गोठवलं. परंतु, ज्या निवडणुकीसाठी हे केलं ती निवडणूक त्यांनी लढविली नाही. ज्यांनी अर्ज भरला त्यांनी पराभवाचा अंदाज आल्याने माघार घेतली. अधिकृत चिन्हावरही निवडणूक लढवली असती नोटाला जी मतं पडली तीच मतं विरोधकांना पडली असती, अशा टोला ठाकरे यांनी यावेळी लगावला.  

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT