एक कोटींच्या बक्षिसाचा वाद, भाजप खासदार गोपाळ शेट्टींनी केला खुलासा
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार गोपाळ शेट्टींनी केलेल्या एका विधानाचे वेगवेगळे अर्थ लावले गेल्यानं नवा मुद्दा चघळला जात आहे. शेट्टींनी एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारला घरचा आहेर दिल्याचंही बोललं गेलं. मात्र, हे सगळं खासदार गोपाळ शेट्टींनी फेटाळून लावलं. ‘मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या मैत्रिणीच्या मुलीला एक कोटींचं बक्षीस आणि इतर शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांना सरकार घर देत नाही,’ […]
ADVERTISEMENT

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार गोपाळ शेट्टींनी केलेल्या एका विधानाचे वेगवेगळे अर्थ लावले गेल्यानं नवा मुद्दा चघळला जात आहे. शेट्टींनी एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारला घरचा आहेर दिल्याचंही बोललं गेलं. मात्र, हे सगळं खासदार गोपाळ शेट्टींनी फेटाळून लावलं.
‘मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या मैत्रिणीच्या मुलीला एक कोटींचं बक्षीस आणि इतर शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांना सरकार घर देत नाही,’ या गोपाळ शेट्टींच्या विधानाची बरीच चर्चा झाली. त्यावर आता खासदार गोपाळ शेट्टींनी सविस्तर खुलासा केलाय.
भाजप खासदार गोपाळ शेट्टी आधी काय म्हणाले होते?
“महाराष्ट्र विधानसभेत होतो, तेव्हापासून यासाठी प्रयत्न करतोय. या तिघांनाही शिवछत्रपती पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी घर मागितलं, तर सरकार देत नाही आणि कबड्डीपटूंमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या मैत्रिणीची मुलगी होती. तिला सुवर्णपदक मिळालं, तर तिला एक कोटी रुपये देण्यात आले, ही कुठली पद्धत आहे?”, असा सवाल गोपाळ शेट्टी उपस्थित केला.
“म्हणजे कोणाची ओळख मंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांशी असेल, तरच त्यांना बक्षीस मिळणार का? तुम्ही (सरकारने) एक मार्गदर्शक नियमावली बनवा. ज्यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळाले आहेत, त्यांना पूर्वी काळी फ्लॅट दिले गेले आहेत. तेव्हा जर तीनशे फुटांचं घर दिलं होतं, आता व्यवस्था मोठी झालीये, सरकार विस्तारलं आहे, ५०० फुटांची जागा द्या, काय फरक पडतो?”, असंही गोपाळ शेट्टी म्हणाले.