भाजप खासदार उदयनराजे भोसले अजित पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण
भाजप खासदार उदयनराजे भोसलेंनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात भेट घेतली. पुण्यातील शासकीय विश्रामगृहात ही भेट झाली. यावेळी अजितदादांसोबत विकासकामांबाबत चर्चा झाल्याचं उदयनराजेंनी सांगितलं आहे. यावेळी पत्रकारांनी त्यांना राष्ट्रवादी जात आहात का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी छत्रपती शिवरायांचं ज्याप्रमाणे सर्वधर्वसमभाव हे धोरणं होतं तसं माझं सर्वपक्ष समभाव हे धोरण आहे, असं उत्तर दिलं […]
ADVERTISEMENT

भाजप खासदार उदयनराजे भोसलेंनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात भेट घेतली. पुण्यातील शासकीय विश्रामगृहात ही भेट झाली. यावेळी अजितदादांसोबत विकासकामांबाबत चर्चा झाल्याचं उदयनराजेंनी सांगितलं आहे. यावेळी पत्रकारांनी त्यांना राष्ट्रवादी जात आहात का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी छत्रपती शिवरायांचं ज्याप्रमाणे सर्वधर्वसमभाव हे धोरणं होतं तसं माझं सर्वपक्ष समभाव हे धोरण आहे, असं उत्तर दिलं आणि हसले.
या भेटीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी एक फेसबुक पोस्टही लिहिली आहे. सातारा नगरपरिषदेच्या वाढीव हद्दीतील विकासकामांना प्राथमिक सोयी सुविधा अंतर्गत अनुदान मिळण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन तसा प्रस्ताव त्यांनी दिला आहे.
काय म्हटलं आहे उदयनराजेंनी?
सातारा नगरपरिषदेच्या नवीन वाढीव हद्दीतील विकास कामांना प्राथमिक सोयी सुविधा अंतर्गत अनुदान मिळणेबाबत आज उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांची भेट घेऊन प्रस्तावाद्वारे मागणी केली. सातारा नगरपरिषद ही ‘अ’ वर्ग नगरपरिषद असुन नुकतीच सातारा नगरपरिषदेची हद्दवाढ झालेली आहे. त्यामुळे २१.०४ चौ.कि.मी. इतके क्षेत्र वाढ होऊन एकूण २९.१९ चौ.कि.मी. इतके झाले आहे. हद्दवाढ झालेल्या क्षेत्राचे संपुर्ण सर्वेक्षण करण्यात आले असून या भागातील आवश्यक त्या रस्ते, गटारी, पथदिवे व ओपन स्पेस विकसीत करणे इ. प्राथमिक सोयी सुविधा पुरविण्यसाठी पहिल्या टप्प्यातील कामांची अंदाजपत्रके नगरपरिषदेने केली आहेत. त्याची एकूण किंमत रु.४,८५० लक्ष इतकी आहे.