मंत्रिमंडळ विस्तारामुळे अपक्ष-शिंदे गटात धूसफूस! भोंडेकर स्पष्टच बोलले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra cabinet expansion) लांबत असल्यानं आमदारांमध्ये (MLA) नाराजी असल्याची बाब सातत्यानं समोर आलीये. त्यामुळे आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचंही राजकीय वर्तुळात (Maharashtra politics) बोललं जात आहे. बच्चू कडूंनीही (bacchu kadu) नाराजी व्यक्त केलीये. आता शिंदे गटातील (Shinde faction) आमदार नरेंद्र भोंडेकर (mla narendra bhondekar) यांनीही अप्रत्यक्षपणे खदखद व्यक्त केलीये.

राजकीय वर्तुळाचं आणि विशेषतः शिंदे गट आणि अपक्ष आमदारांचं नजरा लागल्या आहेत, त्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे. शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, असं सातत्यानं म्हटलं जात असलं, तरी त्याबद्दल कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत. त्याचमुळे शिंदे गटातील आमदार आणि अपक्ष आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता अधूनमधून बाहेरही आलीये.

त्यात आता भर टाकलीये ती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे म्हणजे शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर. आता आमदार नरेंद्र भोंडेकर काय म्हणाले, ते वाचा.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नागपूरमध्ये बोलताना आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले, “बच्चू कडू हे आक्रमक नेते आहेत. हा परिवाराचा विषय आहे. नाराजी असून, नसून चालत नाही. घरामध्ये प्रत्येकाच्या मनासारखं होत नसतं. पण, प्रामाणिक हे आहे की मंत्रिमंडळ विस्तार आता व्हायला पाहिजे.”

“शेवटच्या सहा महिन्यात मंत्री बनवतील. महामंडळ देतील, तर त्याला अर्थ काय राहणार? आपल्या मतदारसंघात तयारी करतील की, राज्य सरकारचं काम करतील. त्यामुळे आता हा वेळ आहे. दीड वर्षात काम करायला संधी आहे. मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे), उपमुख्यमंत्र्यांनी (देवेंद्र फडणवीस) विस्तार करणं अपेक्षित आहे. 26 जानेवारीच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल.”

ADVERTISEMENT

मंत्रिमंडळ विस्तार विलंब : बच्चू कडूंनंतर भोंडेकरांची खदखद

राज्यात सत्तांतर होऊन काही महिने लोटले तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळेच शिंदे गटात अस्वस्थता असल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा सुरूये. आमदार भोंडेकरांनी यावरूनच मनातील खदखद व्यक्त केलीये. “शेवटच्या सहा महिन्यात मंत्री बनवतील. महामंडळ देतील, तर त्याला अर्थ काय राहणार? आपल्या मतदारसंघात तयारी करतील की, राज्य सरकारचं काम करतील”, या विधानातूनच भोंडेकरांनी अप्रत्यक्षपणे नाराजी बोलून दाखवलीये.

ADVERTISEMENT

बच्चू कडू यांनीही केला होता प्रहार

बच्चू कडू यांनीही मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे-फडणवीसांवर निशाणा साधला होता. “फूल काढायचे, खिशात ठेवायचे. पुन्हा काढायचे असे करू नका. काही तांत्रिक बाबी असतील, तर मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) व उपमुख्यमंत्र्यांनी (देवेंद्र फडणवीस) सांगून टाकावं. अमूक एक तांत्रिक अडचणीमुळे विस्तार होऊ शकत नाही. सगळ्या 50-60 आमदारांपैकी कुणीही काही बोलणार नाही. विस्तार होणार असेल तर लगेच करावा; एक घाव दोन तुकडे करायला पाहिजेत”, असं म्हणत बच्चू कडूंनी जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली होती. त्यामुळे सत्ताधारी आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याच्या चर्चेलाच दुजोरा मिळाला होता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT