विश्वासघातानं गेलेलं सरकार मेहनतीने परत आणता येतं – चंद्रकांत पाटलांच्या विधानामुळे चर्चांना उधाण
कोरोनानंतर आता जनजीवन सुरळीत सुरू झालंय. आता राजकारणालाही वेग येईल. विश्वासघातानं गेलेलं सरकार मेहनतीनं परत आणता येतं. ते महिन्यात येईल किंवा नव्या वर्षात येईल. पण राज्यात नक्की राजकीय परिवर्तन होईल, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केलं आहे. चंद्रकांत पाटलांच्या या विधानानंतर राज्यात पुन्हा एकदा सत्ताबदलाच्या चर्चांना उधाण आलं आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार […]
ADVERTISEMENT
कोरोनानंतर आता जनजीवन सुरळीत सुरू झालंय. आता राजकारणालाही वेग येईल. विश्वासघातानं गेलेलं सरकार मेहनतीनं परत आणता येतं. ते महिन्यात येईल किंवा नव्या वर्षात येईल. पण राज्यात नक्की राजकीय परिवर्तन होईल, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केलं आहे. चंद्रकांत पाटलांच्या या विधानानंतर राज्यात पुन्हा एकदा सत्ताबदलाच्या चर्चांना उधाण आलं आहे.
ADVERTISEMENT
विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते.
कोरोना संसर्गामुळं गेली दोन वर्षं राज्य सरकारविरोधात भाजप फारसं आक्रमक झालं नाही. आता मात्र सर्वच स्तरावर अपयशी ठरलेल्या ठाकरे सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याची वेळ आलीय. पेट्रोल-डिझेलपेक्षाही महाराष्ट्र सरकारला दारू महत्त्वाची वाटते. त्यामुळंच त्यांनी पेट्रोल-डिझेलवरील कर कपात करण्याऐवजी विदेशी दारूवरील आयात शुल्क कमी करून दारू स्वस्त केली. कोरोना काळातही त्यांनी मंदिरांऐवजी दारू दुकानांचे दरवाज उघडले. त्यावरून या सरकारचा प्राधान्यक्रम जनतेच्या लक्षात आलाय. आता जनजीवन सुरळीत सुरू झालंय. त्यामुळं राजकारणालाही वेग येईल. विश्वासघातानं गेलेलं सरकार मेहनतीनं परत आणता येतं. ते नेमकं कधी येईल, हे मी आताच सांगू शकत नाही. पण ते महिन्यात येईल किंवा नव्या वर्षातदेखील येईल, असं वक्तव्य करून, चंद्रकांतदादा पाटील यांनी नव्या राजकीय घडामोडींचे संकेत दिले आहेत.
हे वाचलं का?
ST Strike : शरद पवार आणि अनिल परब यांच्यातील बैठक संपली; पर्यायांवर लवकरच होणार निर्णय
कोरोनाचा संसर्ग रोखण्यापासून ते एस.टी. कर्मचार्यांच्या संपापर्यंत सर्वच बाबतीत महाराष्ट्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केलाय. हे सरकार लोकांच्या उपयोगाचं नसल्यानं, वेळीच बदल घडवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
ADVERTISEMENT
दरम्यान विधानपरिषदेच्या जागेसाठी अमल महाडीक यांचा विजय निश्चीत असल्याचा विश्वास यावेळी चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला. आमदार प्रकाश आवाडे आणि विनय कोरे भाजपसोबत असल्यानं, विधानपरिषद निवडणुकीत अमल महाडिक यांचा विजय निश्चित असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.
ADVERTISEMENT
काँग्रेसचं ‘मिशन नागपूर’! भाजपचा बालेकिल्ला फोडण्यासाठी संघ स्वयंसेवकाला घेतलं पक्षात
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT