”शरद पवारांचं संपूर्ण आयुष्य तोडफोडीत गेलं”- बावनकुळे; उद्धव ठाकरेंनाही लगावला टोला
भास्कर मेहेरे, प्रतिनिधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज ठाण्यामध्ये होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी केंद्र सरकारपासून राज्य सरकारवरती सडकून टीका केली होती. यालाच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे. शरद पवारांवरती जहरी टीका करताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवरतीही निशाणा साधला आहे. शरद पवारांच्या टीकेवरती काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे? […]
ADVERTISEMENT

भास्कर मेहेरे, प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज ठाण्यामध्ये होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी केंद्र सरकारपासून राज्य सरकारवरती सडकून टीका केली होती. यालाच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे. शरद पवारांवरती जहरी टीका करताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवरतीही निशाणा साधला आहे.
शरद पवारांच्या टीकेवरती काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
”शरद पवारांच्या संपूर्ण आयुष्याचा इतिहास बघितला तर संपूर्ण आयुष्य तोडफोडीत गेलं आहे. स्वतःच्या भरवश्यावर 100 आमदार कधी आणले नाहीत. जेव्हा जेव्हा सत्ता मिळवली तेव्हा तेव्हा तोडफोडीतुन मिळवली” अशी टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले ”मोदींनी 8 वर्षामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचं काम केलं आहे. याचं प्रमाणपत्र जनता देत आहे शरद पवारांच्या सर्टिफिकेटची गरज नाही”
उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवरती निशाणा तर साधलाच त्याचबरोबर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. ”हिंदुत्व शिवसेनेचं नाहीच, शिवसेना ही एकनाथ शिंदेंची आहे, उद्धव ठाकरेंची नाही. उध्दव ठाकरेंचा फक्त गट राहिला आहे. हिंदुत्ववादी शिवसेना ही एकनाथ शिंदेंची आहे”.