Nawab Malik : कोल्हापुरात नवाब मलिकांचा पुतळा जाळला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्या पाठोपाठ मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांवरही गंभीर आरोप केले आहेत.

हे वाचलं का?

सध्या नवाब मलिक विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला असून, फडणवीसांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा दावाही मलिक यांनी केला.

ADVERTISEMENT

मलिक यांच्याकडून लागोपाठ होत असलेल्या आरोपांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात निदर्शनं केली.

ADVERTISEMENT

कोल्हापुरातील बिंदू चौकात निदर्शनं करण्यात आली. यावेळी नवाब मलिक यांना देशद्रोही म्हणत भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा पुतळा जाळला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा, अशी मागणी यावेळी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT