मुंबई केंद्रशासित करण्यासाठी भाजपचं प्रेझेंटेशन तयार, कटात सोमय्यांसारखे लफंगे-संजय राऊत
मुंबई केंद्रशासित करण्यासाठी भाजपने प्रेझेंटेशन तयार केलं आहे. मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. किरीट सोमय्या या सगळयाचं नेतृत्व करतोय. त्याच्यासारखे काही लफंगेही या कटात सहभागी आहेत असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला आहे. किरीट सोमय्या हा या कटाचा सूत्रधार आहे असंही राऊत यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही […]
ADVERTISEMENT
मुंबई केंद्रशासित करण्यासाठी भाजपने प्रेझेंटेशन तयार केलं आहे. मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. किरीट सोमय्या या सगळयाचं नेतृत्व करतोय. त्याच्यासारखे काही लफंगेही या कटात सहभागी आहेत असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला आहे. किरीट सोमय्या हा या कटाचा सूत्रधार आहे असंही राऊत यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर त्यांच्यासोबत वाराणसीमधील एक व्यक्ती आणि मुंबईतील भाजपशी संबंधित एक मोठा बिल्डर आहे असंही राऊत यांनी माध्यमांना सांगितलं.
ADVERTISEMENT
किरीट सोमय्या हे दोन कारणांसाठी दिल्लीला जात असतात. एक म्हणजे खोटे कागद घेऊन जायचं आणि दुसरा कट आहे तो मुंबई केंद्रशासित करण्याचा. मुंबईतील काही धनिक, बिल्डर यांच्या संगनमताने किरीट सोमय्या हा कट रच आहेत. मुंबई कशी केंद्रशासित करता येईल त्याचं प्रेझेंटेशनही तयार आहे. त्यांना मुंबईतल्या मराठी माणसाचा अधिकार काढून घ्यायचा आहे मुंबईवर केंद्राचं राज्य आणायचं आहे असाही आरोप संजय राऊत यांनी केला.
मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्यासंदर्भात सोमय्यांसह काही जणांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला एक प्रेझेंटेशन दिले आहे. या कटात मुंबईतील काही धनिक, भाजपचे काही लोक यांच्या संगनमताने सोमय्या नेतृत्व करत आहेत. काही करुन त्यांना मुंबई केंद्रशासित करायची आहे. हे सगळे महाराष्ट्रद्रोही असल्याचे राऊत म्हणाले.
हे वाचलं का?
Kirit Somaiya INS Vikrant: किरीट सोमय्या अडचणीत, फसवणुकीचा गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
शिवसेना खासदार संजय राऊत यांचं ट्विटही चर्चेत
ADVERTISEMENT
किरीट सोमय्यांना उद्देशून संजय राऊत यांनी आज एक ट्विट केलं आहे. त्याचीही चर्चा होते आहे.
ADVERTISEMENT
महात्मा सोमैया
इधर उधर की बात मत कर.
सिर्फ येही बता..save vikrant के लिये जमा किया गयापैसा किधर.. गया .मुद्दा तो यही हैं ना.. देश के नाम पर आपने चोरी की है या नही?
नौटंकी बंद करो..
आंकडे का खेल बाद में खेलेंगे.it’s the matter of police investigation.
समझा क्या?
गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत विरूद्ध किरीट सोमय्या असा सामनाच बघायला मिळतो आहे. किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंचे कोकणात २१ बंगले असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर एक भलीमोठी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. आता काही दिवसांपासून संजय राऊत हे विक्रांत बचाव निधी प्रकरणावरून किरीट सोमय्यांवर टीका करत आहेत. अशात आता आज त्यांनी किरीट सोमय्यांसह भाजपवर गंभीर आरोप केला आहे. मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव आखला जातो आहे. त्या कटात किरीट सोमय्या सहभागी आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT