शिवसैनिकांना रश्मीवहिनींच्या अश्रूंची शपथ घालणाऱ्या शीतल म्हात्रे एकनाथ शिंदे गटात
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर ज्या शीतल म्हात्रेंनी शिवसैनिकांना रश्मीवहिनींच्या अश्रूंची शपथ घातली होती त्याच शीतल म्हात्रे आता शिंदे गटात सहभागी झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंशी निष्ठावान राहिलेल्या शीतल म्हात्रे शिंदे गटात गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज शितल म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जात […]
ADVERTISEMENT
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर ज्या शीतल म्हात्रेंनी शिवसैनिकांना रश्मीवहिनींच्या अश्रूंची शपथ घातली होती त्याच शीतल म्हात्रे आता शिंदे गटात सहभागी झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंशी निष्ठावान राहिलेल्या शीतल म्हात्रे शिंदे गटात गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
आज शितल म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जात शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. मुंबई महापालिका निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या बीएमसीतील सत्ता राखण्याचं कडवं आव्हान सेनेसमोर आहे. आतापर्यंत ठाणे, कल्याण डोंबिवली यासारख्या एकनाथ शिंदेंचं प्राबल्य असलेल्या महापालिकेतील नगरसेवकांनी शिंदे गटात उडी घेतली होती. परंतु मुंबई महापालिकेतून शिंदेंच्या गटात जाणाऱ्या म्हात्रे या पहिल्याच नगरसेविका ठरल्या आहेत. त्यामुळे म्हात्रेंनी वात पेटवल्यानंतर आणखी कोण त्यांच्यापाठी जाणार, याची चर्चा रंगली आहे.
हे वाचलं का?
शितल म्हात्रे यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांचं ट्विट
मुंबई येथील दहिसर विभागातील माजी नगरसेविका शितल मुकेश म्हात्रे यांनी आज वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांना प्रमाण मानून हिंदुत्वाचा विचार स्वीकारून आम्हाला साथ देण्याचा निर्णय घेतला.
यावेळी त्यांचे मनापासून स्वागत करित भावी सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीकरिता शुभेच्छा दिल्या. असंख्य कार्यकर्त्यांसह उपस्थित शितल म्हात्रे यांना भविष्यात आपल्या प्रभागातील लोकोपयोगी विकासकामे करावीत व त्याकरिता सर्वतोपरी सहकार्य आपण करू असे यासमयी बोलताना स्पष्ट केले.
ADVERTISEMENT
मुंबई येथील दहिसर विभागातील माजी नगरसेविका सौ.शीतल मुकेश म्हात्रे यांनी आज वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांना प्रमाण मानून हिंदुत्वाचा विचार स्वीकारून आम्हाला साथ देण्याचा निर्णय घेतला.#realshivsena pic.twitter.com/zov9q5PFaV
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 12, 2022
शीतल म्हात्रे या दहीसर येथील माजी नगरसेविका आहेत. अत्यंत आक्रमक नगरसेविका अशी त्यांची ओळख आहे. २४ जूनला जेव्हा मुंबई तकने त्यांच्याशी संवाद साधला होता त्यावेळी जास्तीत जास्त काय होईल आमची सत्ता जाईल या पलिकडे काही होणार नाही. आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच आहोत असं त्यांनी म्हटलं होतं. तसंच बंड केलेल्या शिवसेना आमदारांना त्यांनी भावनिक साद घातली होती. त्यानंतर एक वादग्रस्त वक्तव्यही केलं होतं. आता याच शीतल म्हात्रे शिंदे गटात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर त्या आता शिंदे गटात आल्या आहेत.
ADVERTISEMENT
माजी नगरसेविका शितल म्हात्रे शिंदे गटात सहभागी झाल्या. काही दिवसापूर्वी बंडखोर आमदारांमा खडसवतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यांनी १५ दिवसात त्यांची भूमिका बदलली आहे. एकनाथ शिंदेंच्या प्रामाणिक कामात माझा खारीचा वाटा म्हणून मी हा निर्णय घेतल्याचं शितल म्हात्रे यांचं म्हणणं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT