कोरोना काळात गंगा किनारी किती मृतदेह पुरले ते सांगा? NGT चे UP-Bihar सरकारला आदेश

मुंबई तक

कोरोना काळात दुसऱ्या लाटेत उत्तर प्रदेशात आणि बिहारमधील गंगा दीत मृतदेह तरंगताना दिसले होते. त्यावरून बराच गदारोळही झाला होता. एवढंच नाही तर यावरून मोदी सरकारवर आणि उत्तर प्रदेश सरकारवर बरीच टीकाही झाली होती. सामना मध्ये अ्ग्रलेख लिहून शिवसेनेनेही टीका केली होती. तसंच विरोधकांनी टीका केली होती. आता या प्रकरणाची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (NGT) ने गंभीर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

कोरोना काळात दुसऱ्या लाटेत उत्तर प्रदेशात आणि बिहारमधील गंगा दीत मृतदेह तरंगताना दिसले होते. त्यावरून बराच गदारोळही झाला होता. एवढंच नाही तर यावरून मोदी सरकारवर आणि उत्तर प्रदेश सरकारवर बरीच टीकाही झाली होती. सामना मध्ये अ्ग्रलेख लिहून शिवसेनेनेही टीका केली होती. तसंच विरोधकांनी टीका केली होती. आता या प्रकरणाची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (NGT) ने गंभीर दखल घेतली आहे.

एनजीटीने या वर्षी ३१ मार्चपर्यंत कोरोना प्रादुर्भाव झाल्यापासून गंगेत तरंगणारे मृतदेह आणि नदीच्या काठावर पुरण्यात आलेल्या मृतदेहांबाबत उत्तर प्रदेश सरकार आणि बिहार सरकारने माहिती द्यावी असं म्हटलं आहे.

कोरोना महामारीचा भयंकर काळ देशाने आणि जगाने पाहिला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूंचं प्रमाण प्रचंड होतं. कोरोनामुळे मृत्यू झाला तर खांदा द्यायलाही लोक नसत. तसंच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी रांगा लागलेल्या आपण पाहिल्या. सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आल्याचंही भीषण आणि वास्तववादी चित्र पाहिलं तसंच गंगा किनारी पुरलेले आणि गंगेत वाहून गेलेले मृतदेहही पाहिले. आता याच प्रकरमी राष्ट्रीय हरित न्यायधिकारणाने (National Green Tribunal) ने माहिती मागवली आहे.

हे वाचलं का?