बॉलिवूडचा किंग शाहरुख खान कोरोना पॉझिटिव्ह, मुंबईत कोरोनाने वाढवली धास्ती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा धोका वाढला आहे. हा विषाणू एकामागून एक कलाकारांना आपल्या विळख्यात घेत आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार सुपरस्टार शाहरुख खान याला कोरोनाची लागण झाली असून त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

अनेक रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खान कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत कोलकात्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे, ‘आत्ताच कळले की आमचा ब्रँड अॅम्बेसेडर शाहरुख खानला कोव्हिडची लागण झाली आहे. तुम्ही लवकर बरे व्हाल अशी प्रार्थना करतो. शाहरुख लवकर बरा हो.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मात्र, असं असलं तरी मुंबई तक शाहरुख खानला कोरोना झाल्याचं वृत्ताची पुष्टी करत नाही.

शनिवारी अभिनेता कार्तिक आर्यन आणि आदित्य रॉय कपूर देखील कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याची बातमी समोर आली होती. तर गेल्या महिन्यात अभिनेता अक्षय कुमार देखील कोव्हिज पॉझिटिव्ह आढळला होता.

ADVERTISEMENT

Covid19 Update : कोरोनाच्या पुन्हा महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर धडका?; 19 रुग्णांचा मृत्यू

ADVERTISEMENT

जवानचा टीझर रिलीज

शाहरुख खान काही दिवसांपूर्वीच करण जोहरच्या पार्टीत दिसला होता. या पार्टीत त्याच्यासोबत पत्नी गौरी खान आणि मोठा मुलगा आर्यनही होता. शाहरुख खान सध्या त्याच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. त्याने 3 जून रोजी त्याच्या ‘जवान’ या नवीन चित्रपटाचा टीझरही रिलीज केला आहे. या चित्रपटात तो एका जखमी व्यक्तीच्या भूमिकेत दिसत आहे. शाहरुख खाननेही जवानचे पोस्टर शेअर केले आहे. हा चित्रपट साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली (Atlee) यांनी बनवला आहे. यामध्ये त्याच्यासोबत साऊथ अभिनेत्री नयनतारा दिसणार आहे.

‘पठाण’ सिनेमाची प्रतिक्षा

दुसरीकडे शाहरुखचे चाहते त्याच्या पठाण या चित्रपटाचीही खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. पठाणमध्ये शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम दिसणार आहेत. पठाणचे शूटिंग बरेच दिवस चालले होते. पण कोरोनामुळे या चित्रपटाचे काम अनेकदा थांबले होते. मात्र आता हा चित्रपट पूर्ण झाला आहे.

शाहरुख बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यासोबतही काम करत आहे. ते दोघे मिळून ‘डंकी’ हा चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटाची घोषणा काही वेळापूर्वी झाली होती. शाहरुखने सांगितले होते की, तो हिरानीसोबत काम करण्यासाठी खूप आनंदी आणि उत्साहित आहे. शाहरुख खानचे सर्व चित्रपट 2023 मध्ये येणार आहेत. त्यामुळेच त्याचे चाहते सध्या खूप उत्सुक आहेत.

शाहरुख 5 वर्षांनी झळकणार मोठ्या पडद्यावर

शाहरुख खान शेवटचा 2018 मध्ये मोठ्या पडद्यावर दिसला होता. त्याने आनंद एल राय यांच्या झिरो या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात अनुष्का शर्मा, मोहम्मद जीशान अयुब आणि कतरिना कैफ यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. हा चित्रपट फ्लॉप ठरला. आता शाहरुख तब्बल 5 वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT