Shilpa Shetty Defamation Case : शिल्पा शेट्टीच्या याचिकेप्रकरणी बॉम्बे हायकोर्टाने दिले ‘हे’ निर्देश
पॉर्न फिल्म प्रकरणात राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीची पोलिसांकडून चौकशी झाली. त्यानंतर शिल्पा शेट्टीने बॉम्बे हायकोर्टात एक याचिका दाखल केली. या याचिकेत तिने मीडियाकडून होणाऱ्या बदनामीबाबत ही याचिका दाखल केली होती. राज कुंद्राचे वकील सुभाष जाधव यांनी राज कुंद्राच्या जामिनासाठी बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र हायकोर्टाने याचिकेवर सुनावणी दरम्यान जामीन देण्यास नकार दिला. […]
ADVERTISEMENT
पॉर्न फिल्म प्रकरणात राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीची पोलिसांकडून चौकशी झाली. त्यानंतर शिल्पा शेट्टीने बॉम्बे हायकोर्टात एक याचिका दाखल केली. या याचिकेत तिने मीडियाकडून होणाऱ्या बदनामीबाबत ही याचिका दाखल केली होती. राज कुंद्राचे वकील सुभाष जाधव यांनी राज कुंद्राच्या जामिनासाठी बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र हायकोर्टाने याचिकेवर सुनावणी दरम्यान जामीन देण्यास नकार दिला. त्यानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीने बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. सोशल मीडिया, मीडिया हाऊसेस आणि इतर प्रसारमाध्यमांवर आपली प्रतिमा मलीन करणारं वार्तांकन केलं जातं आहे या सगळ्याला आळा घालावा अशी मागणी शिल्पा शेट्टीने तिच्या याचिकेत म्हटलं होतं. या याचिकेबाबत आता बॉम्बे हायकोर्टाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे बॉम्बे हायकोर्टाने?
उत्तर प्रदेशमधील एका चॅनलने प्रसिद्ध केलेला आक्षेपार्ह व्हीडिओ आणि काही यूट्युब चॅनल्सवर करण्यात आलेली आक्षेपार्ह वक्तव्य हटवण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र प्रसारमाध्यमांच्या वार्तांकनाबाबत सरसकट कोणताही अंतरिम आदेश न्यायालयाने दिलेला नाही.
हे वाचलं का?
राज कुंद्राचा सहभाग असलेल्या पॉर्न फिल्मबाबतचे वार्तांकन करताना आपली प्रतिमा मलीन केली जात आहे. प्रसारमाध्यमांना त्याविषयीच्या वार्तांकनाला मनई करावी आणि संबंधित माध्यमांना भरपाई देण्याचा आदेश द्यावा अशी विनंती शिल्पा शेट्टीने कोर्टातल्या याचिकेत केली होती. याचिकेत काही माध्यमांनाही प्रतिवादी करण्यात आलं होतं.
शिल्पा शेट्टीच्या वतीने अॅड बिरेंद्र सराफ यांनी बाजू मांडली. ‘राज कुंद्रा प्रकरणात काही माध्यमांचे वार्तांकन वस्तुस्थितीला धरून नाही. त्यात काही अनावश्यक मतं मांडून शिल्पा शेट्टीच्या इमेजला धक्का पोहचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिल्पाचं मातृत्व आणि लहान मुलांच्या पालनपोषणाविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत.’ याबाबतही सराफ यांनी न्यायालयाचं लक्ष वेधलं. कॅपिटल टीव्ही आणि फिल्म विंडो यांनी प्रसारित केलेले व्हीडिओ प्रथमदर्शनी बदनामीकारक आहेत असंही निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.
ADVERTISEMENT
शिल्पा शेट्टीने काय म्हटलं होतं याचिकेत?
ADVERTISEMENT
अश्लील चित्रपट प्रकरणापासून दूर असल्याबाबत दिलेल्या प्रतिक्रियेवर कोणतीही खात्री न करता दिशाभूल करणाऱ्या वार्तांकनामुळे प्रतिमेचं नुकसान झाल्याचा आरोप शिल्पा शेट्टीने या याचिकेमध्ये केला. तसंच या प्रकरणात मला अपराधी असल्याचं दाखवण्यात आलं असून पती राज कुंद्रावर सुरू असलेल्या खटल्यामुळे पतीला सोडून दिलं असल्याचं देखील चुकीचं वार्तांकन करण्यात आलं असल्याचं शिल्पा शेट्टीने म्हटलंय. माध्यमांनी चुकीचे, अपमानजनक, खोटे आणि बदनामीकारक वृत्त प्रकाशित केले आहेत आणि केवळ बदनामीच केली नाही तर आपली प्रतिमा देखील मलीन केली गेली आहे असाही आरोप तिने या याचिकेत केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT