Lok Sabha Election 2024 : ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात विशाल पाटील थोपटणार दंड?
Congress Vishal Patil Ticket Cut Seat Sharing : सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेनेते संघर्ष सुरु होता. यावेळी जागा वाटपाच्या चर्चेदरम्यानच ठाकरेंनी सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा झाली होती. या घोषणेनंतर काँग्रेसचे आमदार विश्वजित पाटील यांनी दिल्लीत काँग्रेसच्या बड्या नेत्यांची भेट घेऊन सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी आग्रही भूमिका मांडली होती.
ADVERTISEMENT
Congress Vishal Patil Ticket Cut Seat Sharing : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आज त्यांच जागावाटप जाहीर केले आहे. या जागावाटपानूसार आता शिवसेना 21, काँग्रेस 17 आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष 10 जागा लढणार आहे. या जागावाटपात सांगलीची जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला देण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसकडुन सांगलीच्या जागेवर इच्छुक असलेले विशाल पाटील नाराज झाले आहेत. त्यामुळे आता विशाल पाटील नेमकी काय भूमिका घेणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. (lok sabha election 2024 sangali seat vishal patil ticket cut chandrahar patil candidate udhhav thackeray shivsena maha vikas aghadi seat sharing)
ADVERTISEMENT
सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेनेते संघर्ष सुरु होता. यावेळी जागा वाटपाच्या चर्चेदरम्यानच ठाकरेंनी सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा झाली होती. या घोषणेनंतर काँग्रेसचे आमदार विश्वजित पाटील यांनी दिल्लीत काँग्रेसच्या बड्या नेत्यांची भेट घेऊन सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी आग्रही भूमिका मांडली होती. मात्र या भूमिकेनंतर सांगलीचा पेच कायम होता.त्यानंतर आज महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत सांगलीची जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला देण्यात आली आहे. त्यामुळे आता सांगलीतून आता चंद्रहार पाटील लोकसभा लढणार आहेत.
हे ही वाचा : मोदींनी डिवचले, ठाकरे भडकले! म्हणाले, "भाकड पक्षाचे..."
दरम्यान सांगलीची जागा काँग्रेसला न मिळाल्याने आता विशाल पाटील नाराज असल्याची माहिती आहे़. तसेच विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर पोस्टरही व्हायरल करण्यात येत आहे. या पोस्टरमध्ये ''आमचं काय चुकलं, जनतेच्या कोर्टाच लढायचं'' असा मजकूर लिहला आहे. हा मजकूर पाहता विशाल पाटील कार्यकर्त्यांशी चर्चा करून अपक्ष लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू आहे.
हे वाचलं का?
तसेच महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेपूर्वी विशाल पाटील यांनी एक्स हँडलवरून गुढी उभारल्याचा कुटुंबासोबतचा फोटोही शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनला त्यांनी गुढीपाडवा हा नव्या सकारात्मक दृष्टीने आयुष्याची सुमंगल सुरुवात करण्याचा सण. या नव्या वर्षात नकारात्मकतेवर मात करीत नवी आव्हाने, नव्या जबाबदाऱ्या पेलण्यास सज्ज होतोय, असे कॅप्शन लिहून त्यांनी सूचक संकेतही दिले होते.
हे ही वाचा : शिंदेंची वर्षा बंगल्यावर बैठक, निवडणूक आयोगाकडून नोटीस
दरम्यान आता उद्या सांगली जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला विश्वजीत कदम, विशाल पाटील, विक्रम सावंत, जयश्रीताई पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांची पत्रकार परिषद होणार आहे. कार्यकर्ते आणि नेत्यांच्या चर्चेंनतर पुढील निर्णय घेतला जाईल, असं शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT