Uddhav Thackeray : मोदींनी डिवचले, ठाकरे भडकले! म्हणाले, "भाकड पक्षाचे..."

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदी यांच्या विधानाबद्दल काय बोलले?
उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्युत्तर.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नकली शिवसेना विधानावर ठाकरेंनी काय दिलं उत्तर?

point

ठाकरे म्हणाले, मोदी भाकड पक्षाचे नेते

point

मोदी शिंदेंच्या शिवसेनेला म्हणाले मूळ शिवसेना.

Uddhav Thackeray Vs Narendra Modi, Duplicate Shiv sena : काँग्रेस सोबत जी शिवसेना (उद्धव ठाकरे यांची शिवसेना) आहे, ती नकली शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्धव ठाकरेंना डिवचले. या विधानावर बोलताना उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना चिमटे काढले. (Uddhav Thackeray criticized Prime Minister Narendra Modi)

ADVERTISEMENT

महाविकास आघाडीने लोकसभा जागावाटपाची घोषणा केली. पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान मोदींनी केलेल्या टीकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. 

वाचा उद्धव ठाकरेंनी काय दिले उत्तर?

उद्धव ठाकरे म्हणाले, "काल तीन गोष्टींचा एकत्र विचित्र योग होता. एक सूर्यग्रहण होतं. अमावस्या होती आणि यांची सभा होती. असा योग पहिल्या प्रथम आपल्या देशात होता. फार विचित्र योग होता, असे सगळे एकत्र येणं. काल जे भाषण झालं, ते देशाच्या पंतप्रधानांचं नव्हतं. ज्याला शिवसेनाप्रमुख कमळबाई म्हणायचे. (शरद पवारांकडे बोट दाखवून) साक्षीदार माझ्या बाजूला बसलेले आहेत. कारण त्यांनी स्वतः अनुभव सांगितलेला आहे. मी त्या पक्षाला भाकड, भेकड, भ्रष्ट जनता पक्ष असं म्हणतो. त्या पक्षाला भाकड किंवा भ्रष्ट पक्षाचे एक नेते."

हे वाचलं का?

मोदी पक्षाचे अध्यक्षही नाही -उद्धव ठाकरे

"कारण निवडणूक प्रचार पंतप्रधान एका पक्षाचा करायला लागले, तर घटनेवर हात ठेवून जी शपथ आम्ही घेतो, त्या शपथेचा भंग होईल. म्हणूनच मला असं वाटतं की, कालचं जे भाषण होतं, ते भाकड जनता पक्षाच्या एका नेत्याचं होतं. कारण ते अध्यक्ष सुद्धा त्या पक्षाचे नाहीत", असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >> मविआचा तिढा अखेर सुटला; कोणती जागा कुणाला, वाचा संपूर्ण यादी 

"आम्ही यापुढे त्यांना जे उत्तर देऊ ते कृपया करून ते पंतप्रधानांना उत्तर दिलं असं कुणी समजू नये. कारण देशाच्या पंतप्रधानांचा अपमान आमच्याकडून कदापि होणं शक्य नाही. आमचे राजकीय जे विरोधक आहेत, त्यात हा भेकड जनता पक्ष आहे", अशी टीका ठाकरेंनी केली.

"शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग करून हे देशभक्त पक्षांना सतावत आहेत. त्यांच्यावर धाडी टाकताहेत, अटका करताहेत. धमक्या देताहेत. यांच्या ताकद नाही म्हणून मी यांना भेकड म्हटलंय. भाकड याच्यासाठी म्हटलंय कारण यांच्याकडे कुणी नेता निर्माण झालेला नाही. आदर्श अशोकरावांचा वेगळा पण, त्या व्यतिरिक्त विचारांचा आदर्श हे देऊ शकले नाहीत", असा उपरोधिक टोला ठाकरेंनी लगावला.  

ADVERTISEMENT

'हा खंडणीखोरांचा पक्ष', मोदींवर ठाकरेंची टीका

"संपूर्ण देशातील भ्रष्ट तितुका मेळवावा आणि भाजप पक्ष वाढवावा, असं त्यांचं धोरण आहे. एनडीए पूर्वी एक ताकदवान आघाडी होती. आता ठिगळांचा पक्ष झालेला आहे. ठिगळ जोडून ते एनडीए करताहेत. नकली सेनेबद्दल म्हणाल, तर ज्यावेळी हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली, तेव्हा कदाचित मोदीजी हिमालयात असतील. मला नक्की कल्पना नाही. आता त्यांनी येऊन म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरील व्यक्तीने महाराष्ट्रातील जनतेला असली सेना आणि नकली सेना म्हणायचं, हा कहर झाला. याचा पक्ष हा खंडणीखोर पक्ष आहे", अशी टीका ठाकरेंनी मोदींच्या विधानाबद्दल बोलताना भाजपवर केली.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> 'राजकीय परंपरेत गुंडांचा शिरकाव', जयंत पाटलांचं महाराष्ट्राला पत्र  

"निवडणूक रोख्यांचा विषय सगळीकडे आलेला आहे. चंदा दो धंदा लो आणि काही ठिकाणी धाडी टाकून निवडणूक रोखे जोरजबरदस्तीने घेतले. खंडणी गोळा करणारे हे केंद्र झालेले आहे. या खंडणीखोर पक्षाचे हे नेते, काल येऊन शिवसेनेला नकली ठरवून गेले. त्यांना मला सांगायचं करू, कृपा करून तुमचा इतिहासाचा जो अभ्यास आहे, तो तपासून बघा", असा चिमटा ठाकरेंनी मोदींना काढला. 

"२०१९ साली तुमच्या पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष अमित शाह हे शिवसेनाप्रमुखांच्या फोटोसमोर लोटांगण घालायला मातोश्रीवर आले होते. तेव्हा मीच होतो, आमची हीच शिवसेना होती आणि तुम्हाला तो विसर जरी पडलेला दिसला, तरी महाराष्ट्रातील जनतेला विसर पडलेला नाही. मला असं वाटतं की, खंडणीखोर पक्षाच्या एका नेत्याने शिवसेनेला असं हिणवणं, बरोबर नाही. कारण यांना शिवसेना सुद्धा गुजरातला पळवायची होती. ती मी पळवू दिली नाही. म्हणून त्यांच्यासोबत जो चायनीज माल बसलेला आहे, त्यात ते सुख मानताहेत. तर त्यांचं सुख त्यांना लखलाभ", असे उत्तर ठाकरेंनी दिले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT