राज कुंद्रा, पूनम पांडे आणि शर्लिन चोप्रा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज बॉम्बे हायकोर्टाने फेटाळला
राज कुंद्रा, पुनम पांडे आणि शर्लिन चोप्रा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज बॉम्बे हायकोर्टाने फेटाळला आहे. 2020 च्या पॉर्न फिल्म प्रकरणात राज कुंद्राचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. राज कुंद्राला या प्रकरणी जुलै महिन्यात आणखी एका पॉर्न फिल्म प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्याचा तपास क्राईम ब्रांचने केला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात त्याला जामीन मिळाला होता. […]
ADVERTISEMENT
राज कुंद्रा, पुनम पांडे आणि शर्लिन चोप्रा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज बॉम्बे हायकोर्टाने फेटाळला आहे. 2020 च्या पॉर्न फिल्म प्रकरणात राज कुंद्राचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. राज कुंद्राला या प्रकरणी जुलै महिन्यात आणखी एका पॉर्न फिल्म प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्याचा तपास क्राईम ब्रांचने केला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात त्याला जामीन मिळाला होता.
ADVERTISEMENT
राज कुंद्रा, पूनम पांडे शर्लिन चोप्रा यांच्यासह एकूण सहा जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाचे न्या. एन डब्ल्यू सांबरे यांनी फेटाळला. तथापि, न्यायमूर्ती सांबरे यांनी पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांच्या अंतरिम संरक्षणात चार आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे.
हे वाचलं का?
“आम्ही या आदेशाला आव्हान देणार आहोत,” असे या खटल्यातील एका आरोपीचे प्रतिनिधित्व करणारे वकील सुदीप पासबोला यांनी सांगितले. न्यायमूर्ती सांबरे यांनी आत्ताच केवळ ऑपरेटिव्ह आदेश दिला आहे, कारणासह सविस्तर आदेश न्यायालय नंतर देईल.
राज कुंद्रावर भारतीय दंड संहितेच्या कलम 292, 293 (अश्लील सामग्रीची विक्री), माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कलम 66E, 67, 67A (लैंगिक सुस्पष्ट सामग्रीचे प्रसारण) आणि महिलांचे अशोभनीय प्रतिनिधित्व (प्रतिबंध) कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
मुंबई उच्च न्यायालयासमोर अटकपूर्व जामीन मागण्यासाठी कुंद्रा यांनी वकील प्रशांत पाटील आणि स्वप्नील अंबीरे यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत सायबर सेलने आपल्याला या गुन्ह्याशी जोडण्याचा प्रयत्न केला असतानाही आपल्याला या प्रकरणात खोटे गोवण्यात आल्याचं म्हटलं आहे. सुनावणीदरम्यान, कुंद्राचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील शिरीष गुप्ते यांनी असा युक्तिवाद केला की, हॉटशॉट अॅपला आरोप केलेल्या गुन्ह्यांशी जोडण्यासाठी फिर्यादीकडे एकही पुरावा नाही, कारण या प्रकरणात आरोपी म्हणून बोलावण्यात आलेल्या अभिनेत्रींपैकी एकाही अभिनेत्रीने कोणताही मुद्दा उपस्थित केला नाही.
ADVERTISEMENT
शिल्पा शेट्टी-राज कुंद्राविरुद्ध मुंबई पोलिसात FIR, आता कोणत्या नव्या प्रकरणात आहेत दोघेही आरोपी?
राज कुंद्राविरोधात सायबर गुन्हे शाखेनं गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पोर्नोग्राफीच्या पहिल्या प्रकरणात गुन्हा दाखल केला गेला. फेब्रुवारी 2019 मध्ये ‘आर्मप्राईम मीडिया प्राईव्हेट लिमिटेड’ नामक कंपनीकडून आपल्याशी संपर्क साधला गेला होता. त्या अॅपमार्फत नवोदित प्रतिभावंत कलाकारांना त्यांचा अभिनय डिजिटल माध्यमातून दाखवण्याची संधी देण्यात येणार होती. त्यांची संकल्पना आवडली आणि व्यवसायिक म्हणून आपण त्यात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याचं कुंद्रानं आपल्या याचिकेत म्हटलं होतं.
त्यानुसार फेब्रुवारी ते डिसेंबर 2019 दरम्यान संबंधित कंपनीशी करार करण्यात आला होता. त्यादरम्यान आपला चित्रपट निर्मितीमध्ये जराही सक्रिय सहभाग नव्हता. तसेच हॉटशॉट्स अॅपमधील पोर्नोग्राफीशीही आपला काहीही संबंध नसून आपल्यावरील आरोप हे खोटे असून आपल्याला यात गोवण्यात आल्याचा दावाही राज कुंद्रानं कोर्टापुढे केला. आत त्याचा जो अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे त्या आदेशाला आव्हान दिलं जाणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT