कुटुंबासह Shopping Mall मधे जाताय? मग हे आधी वाचा; सरकारकडून नियमावली मोठा बदल

मुंबई तक

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यात 14 एप्रिल 2021 पासून राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र दुसरी लाट ओसरू लागल्याने आणि रूग्णसंख्याही कमी झाल्याने १५ ऑगस्टपासून निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा नसलेली दुकानं, शॉपिंग मॉल्स, इतर अस्थापना, ऑफिसेस, सलून, स्पा, जिम, उद्यानं हे सगळं उघडण्यात आलं आहे. कोरोना […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यात 14 एप्रिल 2021 पासून राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र दुसरी लाट ओसरू लागल्याने आणि रूग्णसंख्याही कमी झाल्याने १५ ऑगस्टपासून निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा नसलेली दुकानं, शॉपिंग मॉल्स, इतर अस्थापना, ऑफिसेस, सलून, स्पा, जिम, उद्यानं हे सगळं उघडण्यात आलं आहे. कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळून हे सगळं सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. शॉपिंग मॉल्सही रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. यासंदर्भातली नवी नियमावली आता सरकारने जाहीर केली आहे.

काय आहे शॉपिंग मॉलसंदर्भातली नवी नियमावली?

महाराष्ट्रातील सर्व शॉपिंग मॉल्स रात्री 10 पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा

शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी यांचे तसंच मॉलमधे प्रवेश करणाऱ्या नागिरकांचे कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन डोस आणि ते घेऊन 14 दिवस झालेले असणं आवश्यक

हे वाचलं का?

    follow whatsapp