Viral : ट्रॅव्हल कंपनीने दिला धोका; जोडप्याच्या हनिमूनची वाट… काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Honeymoon News :

ADVERTISEMENT

लग्नानंतर जोडपं हनिमूनला अमेरिकेतील सुप्रसिद्ध हवाई बेटांवर गेलं. पण तिथं गेल्यावर त्या जोडप्यासोबत जे काही घडलं ते नरक यातनांपेक्षा कमी नव्हतं. त्यामुळे जोडप्याच्या हनिमूनची अक्षरशः वाट लागली. त्यानंतर संतापलेल्या जोडप्याने टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनीने आपली फसवून केल्याचा आरोप केला असून त्यांनी कंपनीवर ४० कोटींचा दावाही ठोकला आहे. (After the wedding, Alexander Burkle and Elizabeth Webster went on a honeymoon to the Hawaiian Islands.)

नेमकं काय घडलं या जोडप्यासोबत?

लग्नानंतर अलेक्झांडर बर्कल आणि एलिझाबेथ वेबस्टर हे जोडपं हनिमूनला हवाई बेटांवर गेलं. पण, स्कुबा डायव्हिंगपूर्वीचा सराव सुरु असतानाच टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनीने जोडप्याला समुद्रात मध्यभागी सोडून पळ काढला. त्यामुळे दोघेही समुद्रातून सुमारे ८०० मीटर पोहून किनाऱ्यावर पोहोचले. या दाम्पत्यासह अनेक जण स्कुबा डायव्हिंगपूर्वीचा सराव करत होते. तेव्हाच टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनीने पळ काढल्याचा आरोप केला आहे.

हे वाचलं का?

यानंतर संतापलेल्या जोडप्याने टूर अँड ट्रॅव्हल कंपनीविरुद्ध 40 कोटींचा दावा ठोकला आहे. अलेक्झांडर यांनी सांगितले की, त्यांनी सप्टेंबर 2021 मध्ये हवाईयन बेटांवर हनिमून ट्रिप बुक केली होती. जेव्हा ही टूर कंपनी या दोघांना सोडून पळून गेली तेव्हा समुद्राच्या लाटा उसळ्या मारत होत्या. त्यानंतर या जोडप्याला सुमारे 800 मीटर एकट्याने पोहावे लागले. या जोडप्याला एकदा क्षणाला आपण आता बुडून मरणार आहोत, असंही वाटलं. कसातरी ते समुद्राच्या किनाऱ्यावर पोहोचले.

Girish Mahajan : देवेंद्र फडणवीसांचे चाणक्य मैदानात; यशस्वी शिष्टाई होणार?

ADVERTISEMENT

डेली मेलच्या वृत्तानुसार, जेव्हा हे जोडपं समुद्रकिनाऱ्यावर पोहोचलं तेव्हा त्यांची प्रकृती खूपच बिघडली होती. दाखल केलेल्या खटल्यात जोडप्यानेंं सांगितले की ते डिहायड्रेट झाले होते आणि खूप थकले होते. या जोडप्याचे वकील जार्ड वॉशकोविट्झ यांनी सांगितले की, जेव्हा प्रत्येकजण स्कूबा डायव्हिंगपूर्वी सराव करत होते तेव्हा त्यांना कोणत्याही प्रकारची मदत दिली जात नव्हती. संकटसमयी फोन करू शकेल, अशी कोणतीही व्यवस्था केलेली नव्हती. जोडप्याने सांगितलं की, त्यांचा शोध लागावा म्हणून म्हणून त्यांनी समुद्राच्या वाळूवर ‘SOS’ आणि ‘HELP’ देखील लिहिले. यानंतर स्थानिक लोकांनी त्यांची मदत केली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT