सरकारने ५ टक्के जीएसटी लावला, कंपनीने ५० टक्क्यांनी वाढवली किंमत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

केंद्र सरकारने पॅक्ड दुधाच्या उत्पादनांवर जीएसटी ५ टक्के लावला आहे. मात्र कंपन्यांनी ही किंमत आता थेट ५० टक्के वाढवली आहे. ग्राहकांना आता १० रूपयाचं दही घेण्यासाठी पाच रूपये जास्त मोजावे लागत आहेत. १० रूपयांचं दही १५ रूपयांना मिळेल याचा विचारही कुणी केला नसेल. जीएसटी वाढल्यानंतर या किंमती लगेच वाढल्या आहेत.

ADVERTISEMENT

मागच्या महिन्यात लागू करण्यात आला ५ टक्के जीएसटी

मागच्या महिन्यात केंद्र सरकारने दुधापासून तयार करण्यात आलेल्या डबाबंद उत्पादनांवर GST लावला आहे. १८ जुलै पासून सरकारने दुधाच्या पॅकबंद उत्पादनांवर ५ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. मात्र कंपन्यांनी या उत्पादनांच्या किंमती ५० टक्के वाढवल्या आहेत.

देशातल्या अनेक कंपन्या पॅक दही विकतात. त्यातलंच एक नाव ब्रिटानियाही आहे. ही कंपनी भारतीय बाजारात ८० ग्रॅम, १५० ग्रॅम आणि ४०० ग्रॅम दही विकते. आत्तापर्यंत ८० ग्रॅम दह्याची किंमत १० रूपये होती. मात्र आता ८० ग्रॅम दह्याची किंमत ब्रिटानियाने १५ रूपये केली आहे. याचाच अर्थ ब्रिटानियाने दहा रूपयांच्या दह्याची किंमत आता थेट १५ रूपये केली आहे. त्यामुळे दहा रूपयांना मिळणाऱ्या दह्यासाठी १५ रूपये मोजावे लागत आहेत.

हे वाचलं का?

सरकारने पॅक दह्यावर ५ टक्के जीएसटी लागू केल्या आहेत. मात्र कंपन्या आता जीएसटी लावल्याचं सांगत थेट ५० टक्के दरवाढ करत आहेत. १० रूपयांच्या दह्यावर ५ टक्के जीएसटी लावण्यात आला असेल तर या दह्याची किंमत १० रूपये ५० पैसे इतकी झाली पाहिजे. मात्र ब्रिटानिया प्रमाणेच इतर कंपन्याही किंमती वाढवत आहेत. याचा फटका थेट ग्राहकांना बसतो आहे. महागाईने आधीच त्रासलेल्या जनतेला आता दही विकत घेण्यासाठीही ज्यादा पैसे मोजावे लागत आहेत.

सगळ्याच कंपन्या वाढवत आहेत किंमती..

गेल्या महिन्यात जीएसटी लावण्यात आल्यानंतर सुधा या कंपनीने दही, लस्सी आणि ताक यांच्या किंमती वाढवल्या आहेत. १० रूपयांना मिळणारी १५० ML लस्सी १२ रूपयांना मिळते आहे. १४० ML मँगो लस्सीची किंमतही १० रूपयांवरून १२ रूपये करण्यात आली आहे. तर ताकाची किंमतही १० रूपयांवरून १२ रूपये करण्यात आली आहे. तर सुधा कंपनीचं ८० ग्रॅम दही १० रूपयांना मिळत होतं जे आता १२ रूपयांना मिळू लागलं आहे. दर वाढवण्याचा निर्णय सगळ्याच कंपन्यांनी घेतला आहे. मात्र ब्रिटानियाने थेट ५० टक्के दरवाढ केली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT