विरार : बांधकाम व्यवसायिकाची निर्घृण हत्या, मध्यरात्री रस्त्यात रोखून शस्त्रांनी केले वार
विरार पूर्व भागातील बांधकाम व्यवसायिक निशांत कदम यांची अज्ञात आरोपींनी भर रस्त्यात शस्त्रांनी वार करुन हत्या केली आहे. रविवारी मध्यरात्री तीन वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकारानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पोबारा केला असून विरार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निशांत कदम असं या बांधकाम व्यवसायिकाचं नाव असून मध्यरात्री ३ वाजल्याच्या सुमारास कदम […]
ADVERTISEMENT
विरार पूर्व भागातील बांधकाम व्यवसायिक निशांत कदम यांची अज्ञात आरोपींनी भर रस्त्यात शस्त्रांनी वार करुन हत्या केली आहे. रविवारी मध्यरात्री तीन वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकारानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पोबारा केला असून विरार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
निशांत कदम असं या बांधकाम व्यवसायिकाचं नाव असून मध्यरात्री ३ वाजल्याच्या सुमारास कदम आपल्या राहत्या घरातून ऑफिसच्या दिशेने जात होते. यावेळी आरोपींनी त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांचा पाठलाग केला. अंधार आलेल्या ठिकाणी फायदा घेत आरोपींनी निशांत कदम यांना थांबवलं आणि धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर आणि अंगावर वार केले.
यात निशांत कदम यांचा जागेवरच मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी निशांत कदम यांना धमकीचे फोन येत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आर्थिक वादातून कदम यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT