Thackeray Vs Shinde : ‘हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी…’; खासदार प्रतापराव जाधवांचं चॅलेंज

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एक खासदार आणि दोन आमदार शिंदे गटात गेलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीत उद्धव ठाकरेंनी सभा घेतली. खासदार, आमदारांवर निशाणा साधताना ठाकरेंनी इरादे स्पष्ट केले. ठाकरेंच्या सभेनंतर बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधवांनी आता ठाकरेंनाच प्रतिआव्हान दिलंय.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंनी बुलडाण्यातील शिंदे गटाच्या आमदार, खासदारांना भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हान दिलं. त्यावर खासदार प्रतापराव जाधवांनी आधीच्या पक्षप्रमुखांना आव्हान दिलंय.

प्रतापराव जाधवांचं उद्धव ठाकरेंना आव्हान

चिखलीतल्या सभेत उद्धव ठाकरेंनी गद्दार म्हणत टीका केली. त्यावर प्रतापराव जाधव म्हणाले, ‘हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी माझ्या विरोधात बुलढाण्यातून लोकसभा निवडणूक लढवावी. मी पुढची लोकसभा निवडणूक शिवसेनेतूनच लढणार आहे. भाजकडून लढण्याचा विषय येतो कुठे?”

हे वाचलं का?

“आम्ही शिवसेनेतच आहोत. बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आहोत. भाजप आमचा जुना मित्रपक्ष आहे. जुन्या मित्रपक्षाला सोबत घेऊन आम्ही याआधीच्या सर्व निवडणुका लढवल्या आहेत आणि इथून पुढं येणाऱ्या सगळ्या निवडणुका देखील आम्ही भाजपसोबतच लढणार आहोत. त्यामुळं भाजपकडून लढण्याचा प्रश्न येतो कुठं?”, असं म्हणत प्रतापराव जाधवांनी पूर्वीचे पक्षप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं.

एकनाथ शिंदेंच्या साताऱ्यातच पडणार खिंडार? महेश शिंदे म्हणाले, ‘जेवत्या ताटावरून उठवलं गेलं, ते…’

बुलढाणा जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं काय होणार?

बुलडाणा मतदारसंघ १९९९ पासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. आधी आनंदराव अडसूळ यांचं या मतदारसंघावर वर्चस्व होतं, तर २००९ पासून आजपर्यंत प्रतापराव जाधवांचं. जाधव हे सलग तीन टर्म खासदार आहेत. या मतदारसंघावर शिवसेनेचं वर्चस्व असलं, तरी आता शिवसेनेत फूट पडलीये आणि या मतदारसंघावर वर्चस्व असणारे खासदार प्रतापराव जाधवही शिंदे गटात गेले. त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेचं या मतदारसंघात काय होणार? हा प्रश्न अनुत्तरित आहे.

ADVERTISEMENT

बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधवांनी एकनाथ शिंदेंना साथ दिलीये. त्याचबरोबर मेहकरचे आमदार संजय रायमुलकरांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. बुलडाणा शहरचे आमदार संजय गायकवाड आणि सिंदखेडराजाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनीही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केलाय.

ADVERTISEMENT

बुलडाण्यातील २ आमदार, एक खासदार आणि माजी आमदारही शिंदे गटात गेले. शिवसेनेच्या तीन नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर ठाकरेंची सभा झाली. गर्दीही दिसली. पण, जिथं मतदारसंघावर ज्यांचं वर्चस्व होतं, त्यांनीच ठाकरेंची साथ सोडली. त्यामुळे बुलडाणार मतदारसंघात ठाकरेंची ताकद कमी झाल्याचं बोललं जातंय.

आता प्रतापराव जाधवांनी थेट उद्धव ठाकरेंना निवडणूक लढण्याचं आव्हान दिलंय. आता ठाकरे हे चॅलेंज स्वीकारतात का? ते निवडणुकीच्या मैदानात उतरणार की बुलडाणा जिल्ह्यातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ खेचून आणण्यासाठी जाधवांसह इतर आमदारांविरुद्ध दुसरी रणनीती आखणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT