शिवसेनेचे नेते नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष डी.एम बावळेकर यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

इम्तियाज मुजावर

ADVERTISEMENT

महाबळेश्वर: महाबळेश्वर येथे एका अल्पवयीन मुलीवर घडलेल्या बलात्काराच्या प्रकरणात महाबळेश्वर तालुक्यातील स्थानिक नेता वराज्यातील एका मोठ्या राजकीय पक्षाशी संबंधित असणारा नेता आहे. महाबळेश्वर नगरपालिका माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याच प्रकरणात त्यांच्या मुलांवर आरोप ठेवण्यात आले होते. शिवसेना नेते म्हणून ओळख असणारे महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष डी.एम. बावळेकर यांची दोन्ही मुले या बलात्कार प्रकरणात संशयित आरोपी आहेत. आता या प्रकरणात त्यांचाही संशयित आरोपीम्हणून समावेश झाला असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

हे वाचलं का?

त्यांच्यासह इतर अकरा जणांना सहआरोपी करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवार, २३ सप्टेंबर 2021 रोजी या प्रकरणीपोलिसांनी गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर न्यायालयामध्ये विशेष याचिका दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी म्हणून महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर यांचा आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे.

महाबळेश्वर येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणाने संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यात एकचखळबळ उडाली होती. पिडीत मुलीची तक्रार महाबळेश्वर पोलीस ठाणे मध्ये दाखल झाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारीडॉक्टर जानवे खराडे यांनी हा तपास स्वतः हाताळला व संशयित आरोपी म्हणून एकूण 13 जणांना या प्रकरणात दोषी म्हणून त्यांच्यावर पीडिताच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता आता यामध्ये आणखीन एक संशयित आरोपी म्हणून महाबळेश्वरच्या माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर यांचा समावेश करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

बलात्कारातून अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली होती.

वरील बलात्काराने पिडीत मुलगी गरोदर देखील राहिली होती. तिने एका बाळाला जन्मदेखील दिला होता. त्यानंतरच हाधक्कादायक प्रकार उघडकीस आला. गुरुवार, २३ सप्टेंबर रोजी या संपूर्ण प्रकरणाला आणखीन गंभीर वळण प्राप्त झाले असून राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या स्थानिक पुढाऱ्याच्या मुलावर या प्रकरणाशी संबंधित गंभीर आरोप करण्यात आले होते. तरएकूण तेरा संशयितांमध्ये एका वकिलाचाही समावेश असल्याचं समोर आले होते. त्यानंतर आता महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्षडी एम बावळेकर यांचा ही संशयित आरोपी म्हणून समावेश झाला असून एकूण या प्रकरणात 14 आरोपी झाले असल्याची माहितीपोलिसांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT