हिटलरगिरी करुन वेगळं राज्य निर्माण करण्याचा केंद्राचा डाव, मंत्री यशोमती ठाकूरांचा गंभीर आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

स्मिता शिंदे ,चाकण(पुणे): लोकशाहीला विरोध करुन हिटलरगिरी निर्माण करुन वेगळं राज्य निर्माण करण्याचा डाव केंद्र सरकार रचत असल्याचा गंभीर आरोप राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे. एवढंच नाही तर देशाचं संविधानाला तोडण्यासह देशाचा झेंडा बदलण्याचा डाव सुरु असल्याचाही गंभीर आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे. यशोमती ठाकूर या चाकण येथील महिला मेळाव्यात बोलत होत्या.

ADVERTISEMENT

झेंडा आणि संविधान बदलण्याचा डाव आखला जात असताना देशातील महिलांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन यशोमती ठाकूर यांनी केला आहे. त्या चाकण येथे काँग्रेस महिला मेळाव्यात बोलत होत्या.

राज्यात महाविकास आघाडी झाली मात्र, पुणे जिल्ह्यात काँग्रेस महाविकास आघाडीच्या सत्तेत असून सत्तेत नसल्यासारखी वागणूक दिली जात असल्याचा गंभीर आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

हे वाचलं का?

विधान परिषदेच्या तोंडावर तीनही पक्ष एकत्र येऊन आमदारांच्या मतांची जुळवाजुळव करत असताना काँग्रेसकडून मात्र महाविकास आघाडीतून दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप यशोमती ठाकूरांकडून केला जात आहे.

राज्यात तीनही पक्षांचे आलबेल असल्याचं सांगण्यात येत आहे. पण पुणे जिल्ह्यात मात्र काँग्रेसला दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा गंभीर आरोप करत यशोमती ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं. यावेळी यशोमती ठाकूर यांनी असंही म्हटलं की, ‘खरं बोलायला आपण कोणालाही घाबरत नाही’,

ADVERTISEMENT

दरम्यान, विधानपरिषदेच्या निवडणुकीला अवघे दोन दिवस शिल्लक असताना यशोमती ठाकूर यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केल्याने महाविकास आघाडीमध्ये सारं काही आलबेल नसल्याचंच समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

Nana Patole: ”आमच्या आमदारांना धमक्या येत आहेत, सर्व रेकॉर्डिंग लवकरच बाहेर काढू”

दुसरीकडे भाजपने विधानपरिषदेत आपले सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीत खरी लढत ही काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांमध्येच असणार आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीप्रमाणे भाजप बाजी मारणार की, काँग्रेस काही चमत्कार घडवून आणणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण अशा वातावरण जर महाविकास आघाडीमध्ये चलबिचल असेल तर त्याचा थेट फायदा हा भाजपला होणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT