कोरोना संकट असतानाही वर्षभर केंद्र सरकारकडून ऑक्सिजनची निर्यात, ‘ही’ माहिती आली समोर
नवी दिल्ली: कोरोना संकट काळात कृत्रिम ऑक्सिजनचं महत्त्व हे प्रचंड वाढलं आहे. अनेक ठिकाणी तर ऑक्सिजनचा तुटवडा देखील जाणवू लागलेला आहे. पण याच दरम्यान, आता एक अशी माहिती समोर आली आहे की, 2020-21 या मागील आर्थिक वर्षात जेवढ्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्यात केली आहे तेवढी याआधी कधीही करण्यात आली नव्हती. याबाबतचा डेटा हा वाणिज्य मंत्रालयाकडूनच समोर […]
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: कोरोना संकट काळात कृत्रिम ऑक्सिजनचं महत्त्व हे प्रचंड वाढलं आहे. अनेक ठिकाणी तर ऑक्सिजनचा तुटवडा देखील जाणवू लागलेला आहे. पण याच दरम्यान, आता एक अशी माहिती समोर आली आहे की, 2020-21 या मागील आर्थिक वर्षात जेवढ्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्यात केली आहे तेवढी याआधी कधीही करण्यात आली नव्हती. याबाबतचा डेटा हा वाणिज्य मंत्रालयाकडूनच समोर आला आहे. ही निर्यात तेव्हा झालीए की जेव्हा भारत हा कोरोना व्हायरसच्या बाबतीत जगातील तिसरा देश ठरला आहे.
एप्रिल 2020 ते जानेवारी २०२१ या दहा महिन्यात भारताने जगभरात तब्बल 9,301 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्यात केली आहे. या व्यापारातून भारताने जवळजवळ 8.9 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर 2019-20 या वित्तीय वर्षात भारताने 4,514 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्यात केली होती. ज्यातून भारताने 5.5 कोटी मिळवले होते.
कृत्रिम ऑक्सिजन हा कोरोना व्हायरसने गंभीररित्या आजारी असणाऱ्या रुग्णांसाठी महत्त्वाचा घटक आहे. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या ही अधिक असल्याने ऑक्सिजनची मागणी देखील अधिक आहे. पण त्याप्रमाणात पुरवठा होत नसल्याचं दिसून येतंय. महाराष्ट्रासह अनेक राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचं समोर आलं आहे. अनेक ठिकाणी तर अवघे काही तास पुरेल एवढाच ऑक्सिजनचा साठा शिल्लक आहे.
नाशिकच्या रूग्णालयात Oxygen ची गळती, 22 जणांचा मृत्यू