बारामतीचा ‘कार्यक्रम’ पंतप्रधान मोदींसमोरच ठरला : आमदार राम शिंदेंचा गौप्यस्फोट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे : भारतीय जनता पक्षाने लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले असून त्या दृष्टीने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. यातही संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी आता भाजपने कंबर कसली आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या येत्या 22 ते 24 सप्टेंबर दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, खडकवासला व भोर या विधानसभा मतदारसंघांना भेटी देणार असून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

या दौर्‍याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत भाजप आमदार आणि बारामती मतदारसंघाचे प्रभारी राम शिंदे यांनी अनेक राजकीय प्रश्नांना उत्तर दिली. यावेळी राम शिंदे म्हणाले, कोणाचा तरी बालेकिल्ला वाटत असेल पण जो देशात बालकिल्ला (अमेठी) होता, तो आम्ही खेचून आणला. त्यामुळे हा बालेकिल्ला नाही. आम्ही अमेठी जिंकू शकतो; तर बारामती का नाही? असा निर्धारही त्यांनी बोलून दाखविला.

यावेळी राम शिंदे म्हणाले की, बारामतीचा विकास झालेला नाही. बारामती तालुक्यात अद्यापही 40 गावांना पाण्यापासून दूर आहेत. काही ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानामुळे थोडा फरक पडला आहे. रस्त्यांची वाईट अवस्था आहे. या परिस्थितीमध्ये ते विकासाचा दावा करीत आहेत. तो स्पेशल फेल ठरलेला असून कोणत्या पद्धतीच ते राजकारण करतात? असा सवाल केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यंदाच्या वर्षी आपण स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करीत असून सर्व सामान्य जनतेला जाऊन विचारल तर समजले की विकास झालेला पाहण्यास येत आहोत की, भकास झालेला पाहण्यास येत आहे. हे येणाऱ्या काळात निश्चित त्यांना कळेल. अडीच वर्षात स्वतः च्या मतदारसंघात फिरल्या नाहीत. पण आता निर्मला सीतारामन येणार असे समजताच घरोघरी जाऊन फिरत आहे. त्यामुळे येण्या आगोदर त्या घाबरल्या आहेत, हे स्पष्ट होते, अशी टीकाही शिंदे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली.

नरेंद्र मोदी यांच्यासमोर कार्यक्रम ठरला : राम शिंदे

गुरु-शिष्याच्या परवानगीने हा दौरा होत आहे का? यावर राम शिंदे म्हणाले, मी तर काय कोणाचा गुरु नाही आणि शिष्यही नाही. तुम्हाला त्यांच्याशिवाय (नरेंद्र मोदी-देवेंद्र फडणवीस) हा दौरा होत आहे, असे वाटत का? हा दौरा केंद्रीय नेतृत्वाने आणि भाजपने तयार केलेला कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम गुरूंच्यासमोर तयार झाला आहे. आता लक्ष बारामती आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या समोर कार्यक्रम ठरलेला आहे. आता आम्ही कार्यक्रम करणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT