Teachers Day : शिक्षकांकडून मार खाल्ला नसता तर आज भाषण देऊ शकलो नसतो – गडकरींनी सांगितला किस्सा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज शिक्षक दिनानिमीत्त आपल्या शालेय जिवनातला एक किस्सा सर्वांना सांगितला. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निमीत्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

नागपुरातील द साऊथ पब्लिक स्कूल येथे शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. “शाळेत असताना एक विद्यार्थिनी इंग्रजीतून भाषण देत होती. पण तिला ते भाषण द्यायला व्यवस्थित जमलं नाही. आम्ही सर्वांनी त्या मुलीची चांगलीच टर उडवली. यामुळे शिक्षकांनी आम्हाला चांगलंच मारलं.”

शिक्षक मला म्हणाले तिच्या भाषण करायचं धाडसं तरी आहे तुझ्यात तर ते सुद्धा नाही. त्या मारामुळे माझ्या मनात एक निश्चय मी पक्का केला की चला मी पण आता भाषण करुन दाखवेन. त्यावेळी शिक्षकांनी मला मारलं नसतं किंवा माझा अपमान केला नसता तर आज मी भाषण देऊ शकलो नसतो, असं गडकरींनी नमूद केलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT