ठाकरेंच्या नेत्याला बावनकुळेंचं निमंत्रण; ‘झणझणीत सावजी की पाटोडी’चा बेत?
नागपूर: एरव्ही सभागृहात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करुन, टीका करुन एकमेकांवर तुटून पडणारे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते सभागृहाच्या बाहेर मात्र मैत्री आणि स्नेह जपताना दिसतात. हेच चित्र आज (बुधवारी) नागपूर विधिमंडळाबाहेर पाहायला मिळालं. अधिवेशनाच्या अवकाशात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि जितेंद्र आव्हाड एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून गप्पा मारताना दिसून आले. त्याचवेळी तिथं आलेल्या शिवसेना (ठाकरे गट) […]
ADVERTISEMENT

नागपूर: एरव्ही सभागृहात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करुन, टीका करुन एकमेकांवर तुटून पडणारे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते सभागृहाच्या बाहेर मात्र मैत्री आणि स्नेह जपताना दिसतात. हेच चित्र आज (बुधवारी) नागपूर विधिमंडळाबाहेर पाहायला मिळालं. अधिवेशनाच्या अवकाशात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि जितेंद्र आव्हाड एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून गप्पा मारताना दिसून आले.
त्याचवेळी तिथं आलेल्या शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि विधानसभेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांच्याशीही बावनकुळे यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी बोलताना बावनकुळेंनी प्रभू यांना जेवणासाठीही निमंत्रण दिलं. तसंच प्रभू यांनीही अजून दोन दिवस नागपूरमध्येचं असून फोन करुन येण्याचही मान्य केलं. हे सर्व नेते एकमेकांशी अगदी हसत गप्पा मारताना बघून आजूबाजूला उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनाही काहीसा सुखद धक्का बसला.
चंद्रशेखर बावनकुळे हे मुळचे नागपूरचे आहेत. त्यांनी यापूर्वीही अधिवेशनाच्या दरम्यान आणि दौऱ्यांच्या दिवसांमध्ये भाजपच्या आणि मित्रपक्षातील नेत्यांसाठी जेवणाचा बेत केला आहे. आता सुनिल प्रभूंसाठी ते झणझणीत सावजी मटण आणि रस्स्याचा बेत करतात की सुप्रसिद्ध शाकाहारी पाटोडीच्या भाजीचा बेत करतात हे पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे.