Pune: ‘सौ दर्द छुपे है सिने मैं मगर..’, छगन भुजबळांचा शेर, अनेकांच्या भुवया उंचावल्या!
पुणे: ‘सौ दर्द छुपे है सिने मैं… मगर अलग मजा है जिने मैं’, अशी शेरोशायरी राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केल्याने सर्वांच्याच भुवया आता उंचावल्या आहेत. महात्मा फुले समता परिषदेचा समता पुरस्कार प्रदान समारोहासाठी पुण्यातील समता भूमी, फुले वाडा येथे अन्न नागरी पुरवठा मंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक […]
ADVERTISEMENT

पुणे: ‘सौ दर्द छुपे है सिने मैं… मगर अलग मजा है जिने मैं’, अशी शेरोशायरी राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केल्याने सर्वांच्याच भुवया आता उंचावल्या आहेत. महात्मा फुले समता परिषदेचा समता पुरस्कार प्रदान समारोहासाठी पुण्यातील समता भूमी, फुले वाडा येथे अन्न नागरी पुरवठा मंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ हे हजर होते.
भुजबळांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार रविवारी (28 नोव्हेंबर) सोहळा पडला. ज्यासाठी छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल उपस्थित होते. यावेळी बोलताना भुजबळांनी तुफान फटकेबाजी केली. यावेळी भुजबळांनी आपल्या खास शैलीत विरोधकांवर देखील निशाणा साधला.
दरम्यान, याच कार्यक्रमात बोलताना छगन भुजबळांनी बरीच शेरोशायरी केली. मात्र त्यांच्या एका शेरमुळे सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत.
पाहा छगन भुजबळ नेमकं काय-काय म्हणाले: