हर हर महादेव : …तर आयुष्यभर ऐतिहासिक चित्रपटांना विरोध करणार नाही; संभाजीराजे भडकले

मुंबई तक

हर हर महादेव चित्रपट आज टिव्हीवर प्रदर्शित होणार असून, यावरून छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. त्याचबरोबर सिनेमॅटिक लिबर्टीच्या मुद्द्यावरून निर्माते-दिग्दर्शकांना सवालही केलेत. संभाजीराजेंनी नेत्यांच्या मौनावर नाराजी व्यक्त केली. छत्रपती संभाजीराजे म्हणाले, “इतिहासाची मोडतोड करून जर चित्रपट दाखवत असाल, त्याला माझा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

हर हर महादेव चित्रपट आज टिव्हीवर प्रदर्शित होणार असून, यावरून छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. त्याचबरोबर सिनेमॅटिक लिबर्टीच्या मुद्द्यावरून निर्माते-दिग्दर्शकांना सवालही केलेत. संभाजीराजेंनी नेत्यांच्या मौनावर नाराजी व्यक्त केली.

छत्रपती संभाजीराजे म्हणाले, “इतिहासाची मोडतोड करून जर चित्रपट दाखवत असाल, त्याला माझा वैयक्तिक विरोध असणार आहे. त्याला सर्व शिवभक्तांचा विरोध आहे. ऐतिहासिक चित्रपट यायलाच हवेत, त्याबद्दल दुमत नाहीये. सिनेमॅटिक लिबर्टीचा फायदा घेऊन अनेक चित्रपट असे समोर येताहेत, जे मोडतोड केल्याचं सिद्ध होतं.”

पुढे बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले, “माझा प्रामाणिक भावना आहे. नवीन पिढीला जो इतिहास दाखवला जातो, ती पिढी हाच इतिहास घेऊन पुढे जाणार आहेत. दुर्वैवाने नवी पिढी पुस्तक वाचत नाही. वाचन कमी झालेलं आहे. त्यामुळे चित्रपटातून जे दाखवलं जातं, तेच खरं मानलं जातं. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली प्रामुख्याने हर हर महादेव जो चित्रपट निघालाय, त्यांनी काय सांगितलं की, आम्हाला सेन्सॉर बोर्डाच्या सगळ्या परवानग्या आहेत.”

‘हर हर महादेव’ विरोधाची धार तीव्र; बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांचाही आक्षेप

हे वाचलं का?

    follow whatsapp