दिल्लीचा आदेश येताच मुख्यमंत्री शिंदेंनी गुंडाळला पहिल्या दिवसाचा महाराष्ट्र दौरा!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

औरंगाबाद: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सतत दिल्लीला जात आहेत म्हणून त्यांच्यावर टीका होत असतानाच शिंदे पुन्हा एकदा दिल्लीला निघाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री तथा भाजप नेते अमित शाह (Amit Shah) यांच्या भेटीला ते औरंगाबादहून (Aurangabad) रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. दौरा मधेच सोडून गेल्याने शिंदे टीकेचे धनी ठरत आहेत. आता एकनाथ शिंदे एवढ्या लगबनीने दिल्लीला का गेले याचा खुलासा अद्याप झालेला नाहीये.

ADVERTISEMENT

दिल्लीला जाण्यापुर्वी एकनाथ शिंदेंचे येवला, वैजापूर इशे कार्यक्रम होते. दिवसभर एकनाथ शिंदे दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी मोठमोठे भाषण ठोकले परंतु येवला आणि वैजापूर इथे त्यांनी अगदी कमी वेळात आपली सभा आटपली. विशेष म्हणजे महालगाव येथील कार्यक्रमाला एकनाथ शिंदे ३० मिनीट अगोदर पोहोचले होते. उद्या पुन्हा एकदा एकनाथ शिंदे औरंगाबादमध्ये येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. एकनाथ शिंदेंचे तातडीने दिल्लीला जाण्याचे कारण समजले नसले तरी मंत्रीमंडळ विस्तार हे प्रमुख कारण असल्याची चर्चा आहे.

मंत्रीमंडळ विस्ताराचं कोडं सोडवायला एकनाथ शिंदे दिल्लीला?

एकनाथ शिंदेंच्या सरकारला स्थापन होऊन एक महिना उलटला आहे. तरीही मंत्रीमंडळ विस्तार झालेले नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघेच कॅबीनेट बैठक घेत आहेत. त्यामुळे विरोधक त्यांच्यावर टीका करत आहेत. शिंदे गटाला मुख्यमंत्री पद मिळाल्यामुळे भाजप मलाईदार खाती मागत असल्याची चर्चा आहे. भाजप ६५ टक्के तर शिंदे गट ३५ टक्के मंत्रीपदं मागत असल्याची चर्चा आहे. परंतु शिंदे गटाने ५०-५० टक्के मंत्रीपदाची मागणी केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या या दिल्लीवारीमुळे मंत्रीमंडळ विस्ताराचं कोडं सुटणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हे वाचलं का?

आम्ही बंडखोरी, गद्दारी केलेली नाही- एकनाथ शिंदे

आम्ही कुठलीही बंडखोरी किंवा गद्दारी केलेली नाही. आम्ही क्रांती घडवली. जो अन्याय होत होता त्याविरोधात आम्ही क्रांती केली. याची दखल फक्त महाराष्ट्राने नाही तर जगातल्या ३३ देशांनी याची दखल घेतली. तरीही आमच्या माथी गद्दारांचा शिक्का लावला गेला. एवढा मोठा उठाव का झाला याचं मूळ शोधलं पाहिजे.. मात्र तसं झालेलं नाही. आमच्यावर शिक्के मारले जात आहेत मात्र जनतेने आम्हाला स्वीकारलं आहे असंही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मालेगावमधल्या सभेत म्हटलं आहे.

आदित्य ठाकरेंनी टीका केलेल्या आमदारांच्या मतदारसंघात दौरा

आदित्य ठाकरेंनी शिव संवाद यात्रेदरम्यान आमदार दादाजी भुसे, आमदार सुहास कांदे, आमदार अब्दुल सत्तार, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संदीपान भुमरे यांच्या जाहीर टीका केली होती. या सर्वंच आमदारांची भेट आता शिंदे घेणार होते. त्यामुळे या दौऱ्यात ते काय उत्तर आदित्य ठाकरेंना हे औत्सुक्याचं असणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT