Kolhapur: अचानक नव्हे तर ठरवून भेटले मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस: सूत्र

मुंबई तक

कोल्हापूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची कोल्हापूरमध्ये रस्त्यात झालेली भेट ही सध्या खूपच चर्चेत आहे. खरं तर एकाच दिवशी हे दोन्ही नेते कोल्हापूरमध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले आहेत. अशावेळी कोल्हापूरमधील शाहूपुरी परिसरात दोन्ही नेत्यांची रस्त्यातच भेट झाली. यावेळी रस्त्यातच थांबून आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये काही काळ चर्चा देखील झाली. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

कोल्हापूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची कोल्हापूरमध्ये रस्त्यात झालेली भेट ही सध्या खूपच चर्चेत आहे. खरं तर एकाच दिवशी हे दोन्ही नेते कोल्हापूरमध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले आहेत. अशावेळी कोल्हापूरमधील शाहूपुरी परिसरात दोन्ही नेत्यांची रस्त्यातच भेट झाली. यावेळी रस्त्यातच थांबून आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये काही काळ चर्चा देखील झाली.

दरम्यान, त्यांच्या या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा देखील सुरु झाली. यावेळी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नेमकी काय चर्चा झाली असावी याविषयी अनेक तर्कवितर्क देखील लढवले जात आहे. अनेकांच्या मते, ही भेट योगायोगाने झालेली असावी. मात्र, असं अजिबात नाही. या दोन्ही नेत्यांची ही भेट ठरवून झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.

नेमकी कशी झाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडीमधील पूरग्रस्त भागाची पाहाणी करण्यासाठी जात असतान त्याच ठिकाणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस देखील पहाणी करत असल्याची माहीती मुख्यमंत्र्यांना मिळाली.

हे वाचलं का?