मुलाचा लग्न सोहळा रद्द करणाऱ्या मंत्र्याचं CM ठाकरेंकडून कौतुक
मुंबई: आपल्या मुलाचा लग्न सोहळा रद्द करणाऱ्या राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (21 फेब्रुवारी) प्रचंड कौतुक केलं आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत एकूण माहिती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी आज संवाद साधला. याचवेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्री नितीन राऊत यांनी घेतलेल्या निर्णयाचं आपल्या भाषणात खूप कौतुक केलं. गेले काही महिने कोरोनाची रुग्णसंख्या ही कमी […]
ADVERTISEMENT
मुंबई: आपल्या मुलाचा लग्न सोहळा रद्द करणाऱ्या राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (21 फेब्रुवारी) प्रचंड कौतुक केलं आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत एकूण माहिती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी आज संवाद साधला. याचवेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्री नितीन राऊत यांनी घेतलेल्या निर्णयाचं आपल्या भाषणात खूप कौतुक केलं.
ADVERTISEMENT
गेले काही महिने कोरोनाची रुग्णसंख्या ही कमी झाली होती. त्यामुळे राज्य सरकारने अनेक गोष्टींवरील निर्बंध हटवले होते. त्यामुळे लग्न समारंभ असे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होऊ लागले होते. पण आता पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण हे झपाट्याने वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे लग्न सोहळे कमीत कमी माणसांमध्ये करण्यात यावेत असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. याच दरम्यान, राज्याच्या उर्जामंत्र्यांनी आपल्या मुलाचा लग्न सोहळाचा रद्द करण्याचा निर्णय घेऊन राज्यासमोर एक आदर्श निर्माण केला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
जरुर वाचा: अमरावतीत उद्या रात्री 8 वाजेपासून लॉकडाऊन, पालकमंत्र्यांची घोषणा
हे वाचलं का?
‘याला म्हणतात सामाजिक जाणीव’
एका गोष्टीचा मी अभिमानाने उल्लेख करेन की, माझ्या मंत्रिमंडळातील सहकारी डॉक्टर नितीन राऊत त्यांच्या घरातील लग्न समारंभ अगदी गेल्या आठवड्यात इकडेच येऊन नितीनजी आणि वहिनी यांनी आम्हाला आग्रहाने आमंत्रण दिलं. की, या तारखेला नागपूरमध्ये नंतर मुंबईमध्ये आपण अगत्याने यायचं. यावेळी त्यांनी मला सांगितंल, उद्धवजी काळजी करु नका मी सगळे नियम काटेकोरपणे पाळणार. मी म्हटलं देखील बघा बरं… तर ते म्हणाले नाही काळजी करु नका. पण आज त्यांनी आपल्या मुलाच्या लग्नाचा जो काही सोहळा असतो तो त्यांनी रद्द केला आहे. याला म्हणतात सामाजिक जाणीव, नितीनजी मी तुम्हाला, तुमच्या मुलाला या शुभकार्यासाठी शुभेच्छा तर देतोच. जनतेच्या वतीने आशीर्वाद देखल देतो आणि आपण दाखवलेली ही जाणीव इतरही सगळे जण दाखवतील अशी अपेक्षा करतो.
ADVERTISEMENT
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी कौतुक केल्याची बातमी जेव्हा स्वत: उर्जामंत्री नितीन राऊत यांनी ‘मुंबई तक’वर पाहिली तेव्हा त्यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कौतुकाबद्दल आभार मानले. पाहा यावेळी नितीन राऊतांनी ट्विट करुन नेमक्या काय भावना व्यक्त केल्या आहेत.
ADVERTISEMENT
माझा मुलगा कुणाल यांचा नियोजित विवाह स्वागत सोहळा कोरोनास्थिती लक्षात घेऊन आम्ही स्थगित केला. मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे @CMOMaharashtra यांनी आज राज्याला संबोधित करताना याची दखल घेत आम्ही सामाजिक भान दाखवल्याचे गौरवोद्गार काढले आणि आशीर्वाद दिले त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार pic.twitter.com/hR8DaRhPyl
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) February 21, 2021
अमरावतीत लॉकडाऊन तर मुंबईत 1000 हून अधिक सोसायट्या सील
अमरावती, अकोला या भागात जिल्हा प्रशासनाने लॉकडाउन जाहीर केलं आहे. मुंबईतही ५ पेक्षा जास्त रुग्ण आढळणाऱ्या सोसायट्या सील केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आता पुन्हा एकदा लॉकडाउनच्या उंबरठ्यावर येऊन उभा राहिला आहे. असंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भाषणानंतर दिसून येत आहे
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT