chinchwad bypoll: उमेदवारीसाठी स्पर्धा! तीन NCP नेत्यांनी अर्जही घेतले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

chinchwad assembly bypolls 2023 latest Update : एका बाजूला शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष असतानाच आता दुसऱ्या बाजूला कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची (chinchwad assembly bypolls) रणधुमाळी सुरु झालीये. आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनामुळे कसबा पेठ आणि आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक होतेय. हे दोन्ही आमदार भाजपचे (Bjp Mla) होते. आता याच जागांवर भाजप कोणाला संधी देणार याकडे याबद्दल कुजबूज सुरू असताना राष्ट्रवादीनेही (NCP) तयारी सुरू केलीये. पोटनिवडणुकीच्या निवडणुकीसाठी अर्ज स्वीकारणे आणि विक्री करणे प्रक्रिया सुरू झालीये, अशात पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी या निवडणुकीसाठी पुढाकार घेतलाय… (chinchwad assembly constituency by election latest news)

ADVERTISEMENT

सध्या चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूकीसाठी भाजपा आणि महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळणार हे अद्याप गुलदस्त्यात जरी असलं तरी मात्र या निवडणुकांसाठी भाजपचं राष्ट्रवादीचे अनेक नेते तयार असल्याचं दिसून येतंय. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे बंडखोर नेते राहुल कलाटे हेदेखील वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत.

22 डिसेंबर 2022 रोजी भाजपाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झालं तर भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी रोजी निधन झालं. यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली. अशात या दोन जागांसाठी 5 जणांचे प्रस्ताव भाजपच्या कमिटीने केंद्राकडे पाठवले असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली, तर दुसरीकडे राष्ट्रवादीही या या दोन जागांवर लढणार असून इच्छुकांच्या अर्जाची छाणणी सुरु आहे.

हे वाचलं का?

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक : राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्यांनी अर्ज विकत घेतले?

अर्ज विक्री सुरु झाल्यानंतर चिंचवडच्या जागेसाठी राष्ट्रवादीच्या नावावर राजेंद्र जगताप, माया बारणे, संभाजी बारणे यांनी अर्ज खरेदी केलाय, तर भाजपच्या नावाने कल्पना काटे यांनी अर्ज खरेदी केलाय. यांनी अर्ज जरी खरेदी केले असले तरी मात्र यापैकी कोणाकडेच पक्षाचा एबी फॉर्म नाहीये… या जागेवर लक्ष्मण जगतापांच्या कुटुंबियांपैकी कोणाला उमेदवारी मिळणार हेही चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगताप, बंधू शंकर जगतापपैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. 2 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जगताप कुटुंबीयांशी झालेल्या बंद दाराआड चर्चेकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.

रुपाली ठोंबरे यांना संधी मिळणार का?

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून राष्ट्रवादीमध्ये आलेल्या रुपाली पाटील ठोंबरे यांचीही चर्चा सुरु आहे. मुक्ता दिळक यांच्या निधनानंतर रुपाली पाटील ठोंबरे यांनी या जागेवर लढण्याची इच्छा उघडपणे बोलून दाखवली होती, मनसेमध्ये असतानाही कसबा पेठ विधानसभा निवडणूक लढण्यासाठी रुपाली ठोंबरे इच्छूक होत्या, मात्र त्यांना संधी मिळाली नाही, मात्र आता होत असलेल्या निवडणुकीत रुपाली पाटलांना संधी मिळणार, की राष्ट्रवादीच्या इतर नेत्याची वर्णी लागणार हे पाहणं गरजेचं आहे.

ADVERTISEMENT

आता महाविकास आघाडीचं गणित समजून घ्या

कसबा पेठ आणि चिंचवडच्या जागा महाविकास आघाडीमधला कोणता पक्ष लढणार हे घोषित केलं नाही, दोन्ही जागांवर राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचे स्थानिक नेते इच्छूक आहेत. या दोन्ही जागांवर राष्ट्रवादी लढण्यास तयार असल्याचं आणि त्याप्रकारची चर्चा उद्धव ठाकरे यांच्याची करण्याचं अजित पवारांनी बोलून दाखवलं.

ADVERTISEMENT

अजित पवार चिंचवड आणि कसबा पेठ निवडणुकीबद्दल काय म्हणाले?

“प्रत्येकाला आपापली तयारी करण्याचा अधिकार आहे. मविआच्या बैठकीबद्दल काँग्रेसचे काही नेते नव्हते, पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली आहे. गुरूवार, शुक्रवारी पुण्यात आहे. चिंचवड मतदारसंघातून माझ्याकडे 8 ते 9 लोकांनी उमेदवारी मागितली आहे. त्याबद्दल त्यांच्याशी समोरासमोर बोलणार आहे. त्यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वरिष्ठांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेणार आहे. कसब्यामध्ये काँग्रेस तयारी करत आहे. मागच्या निवडणुकीत आघाडी असताना ही जागा काँग्रेसकडे होती. त्यामुळे काँग्रेसनं तयारी सुरू केली असेल. यासंदर्भात मी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सहकाऱ्यांशी बोलेल”, असं अजित पवार म्हणाले.

आता अजित पवारांनी म्हटल्याप्रमाणे या दोन्ही जागा राष्ट्रवादीला जाणार का, की महाविकास आघाडीच्या नियमानुसार जागा वाटून घेतल्या जाणार, लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांपैकी कोणाला एकाला संधी मिळणार या सगळ्यानंतर वाटाघाडीनंतर या दोन जागांवर कोण बाजी मारणार, हे पुण्यातील राजकारणाला कलाटणी देणार असेल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT