Maharashtra Weather: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस घालणार धुमाकूळ! 'या' भागात पावसाचा जोर वाढणार

मुंबई तक

Maharashtra Weather Today :  महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि पावसाने धुमाकूळ घातला आहे.

ADVERTISEMENT

Maharashtra Weather Today (फोटो - AI)
Maharashtra Weather Today (फोटो - AI)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात कोणत्या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस?

point

या जिल्ह्यात कोसळणार पावसाच्या हलक्या सरी

point

आजच्या हवामानाबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

Maharashtra Weather Today :  महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि पावसाने धुमाकूळ घातला आहे. आज 25 मे 205 रोजी महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि घाट परिसरात (सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे) तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

वादळी वारे ताशी 40-50 किमी वेगाने वाहण्याची शक्यता आहे, विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनाही अपेक्षित आहे. अरबी समुद्रात 21-22 मेपासून तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र 24 मेपर्यंत तीव्र होऊन उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. यामुळे कोकण किनारपट्टीवर समुद्र खवळलेला राहील आणि पावसाचा जोर वाढू शकतो.

प्रादेशिक हवामान अंदाज

कोकण (मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग): ढगाळ वातावरण, हलका ते मध्यम पाऊस आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.कमाल तापमान 34-36 डिग्री सेल्सियस आणि किमान तापमान 21-23 डिग्री सेल्सियस राहील. उष्ण आणि दमट वातावरण कायम राहील. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे, कारण समुद्र खवळलेला असेल.

मध्य महाराष्ट्र (पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक): पुणे आणि आसपासच्या भागात 25 मे रोजी ऑरेंज अलर्ट जारी आहे, ज्यामुळे विजांसह मुसळधार पाऊस आणि ताशी 40-50 किमी वेगाने वारे अपेक्षित आहेत. तापमान 32-38 डिग्री सेल्सियस दरम्यान राहील, परंतु पावसामुळे उष्णतेत काहीशी घट अनुभवली जाऊ शकते.

हे वाचलं का?

    follow whatsapp