दुसऱ्या बायकोला माहेरी सोडलं, पण नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रुममध्ये रंगेहाथ पकडलं! नंतर असं काही घडलं..

मुंबई तक

Husband-Wife Viral News :  हरियाणातील सिरसामध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. कमलजीत नावाच्या एका तरुणाला त्याची पत्नी मोनिकाने गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पडकलं.

ADVERTISEMENT

Wife Caught Husband And His Girlfriend
Wife Caught Husband And His Girlfriend
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बायकोला माहेरी सोडल्यानंतर नवऱ्याने केला मोठा कांड

point

रुममध्ये नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं अन्...

point

त्या दिवशी नेमकं घडलं तरी काय?

Husband-Wife Viral News :  हरियाणातील सिरसामध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. कमलजीत नावाच्या एका तरुणाला त्याची पत्नी मोनिकाने गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पडकलं. कमलजीतचे यापूर्वीच दोन लग्न झाले होते. पण त्याला तिसरं लग्नही करायचं होतं. याच कारणामुळे त्याने त्याची दुसरी पत्नी मोनिकाला सोडण्याचा निर्णय घेतला. परंतु, मोनिका घटस्फोट द्यायला तयार नव्हती.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मोनिकाचं लग्न नोव्हेंबर 2022 मध्ये कमलजीतसोबत झालं होतं. लग्नानंतर तिला माहित झालं की, कमलजीतचं आधीच लग्न झालेलं आहे. असं असतानाही मोनिकाला काही अडचण नव्हती. कमलजीतला एक वर्षांचा मुलगाही आहे. पण 11 महिने आधी कमलजीतच्या आयुष्यात आणखी एका तरुणीची एन्ट्री झाली. जिच्यासोबत त्याला आता लग्न करायचं आहे. यासाठी त्याने मोनिकाला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला.

हे ही वाचा >> Monsoon Rain Update: मान्सून आला रे... 16 वर्षानंतर नवा विक्रम, महाराष्ट्रात 'या' तारखेला पोहचणार!

मोनिका सात महिन्यांपासून माहेरी 

मागील सात महिन्यांपासून मोनिका तिच्या माहेरी राहत आहे. तर कमलजीत एका भाड्याच्या घरात त्याच्या गर्लफ्रेंडसोबत राहत होता. गुरुवारी रात्री जवळपास साडे आठ वाजता मोनिका तिच्या कुटुंबियांसह रुमवर पोहोचली. तिथे मोनिकाने कमलजीतला टॉवेलवर पाहिलं आणि त्याच्यासोबत गर्लफ्रेंडलाही रंगेहाथ पकडलं.

रुममध्ये उडाली खळबळ, कमलजीतने केली मारहाण

मोनिकाला पाहताच कमलजीत भडकला आणि त्याने तिच्यासोबत वादविवाद सुरु केला. त्यानंतर कमलजीतने मोनिकाला मारहाण केली. मोनिकाने आरडाओरडा केल्यानंतर तिचे कुटुंबीय त्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर कमलजीत तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मोनिकाच्या कुटुंबियांनी पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि या प्रकरणाचा तपास सुरु केला.

हे ही वाचा >> Crime News : शाळेच्या व्यवस्थापकाने शिक्षिकेला एकटेच शाळेत बोलावलं अन्...

हे वाचलं का?

    follow whatsapp