ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर आनंदाची बातमी ! मुंबईत आज कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू नाही
राज्यात ओमिक्रॉनचा वाढता प्रभाव पाहता राज्य शासनाने ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू केले आहेत. रात्री ९ ते सकाळी ५ वेळेत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. परंतू याच ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी आज एक आनंदाची बातमी आली आहे. आज मुंबईत एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाहीये. गेल्या २४ तासांत मुंबई शहरात कोरोनाचे नवीन ७५७ […]
ADVERTISEMENT
राज्यात ओमिक्रॉनचा वाढता प्रभाव पाहता राज्य शासनाने ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू केले आहेत. रात्री ९ ते सकाळी ५ वेळेत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. परंतू याच ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी आज एक आनंदाची बातमी आली आहे. आज मुंबईत एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाहीये.
ADVERTISEMENT
गेल्या २४ तासांत मुंबई शहरात कोरोनाचे नवीन ७५७ रुग्ण सापडले असून सक्रीय रुग्णांची संख्या ३ हजार ७०३ पर्यंत पोहचली आहे. मुंबईत सध्या रुग्ण दुप्पटीचा दर हा १३३८ दिवसांवर असून कोविड वाढीचा दरही ०.०५ टक्के इतका आहे.
#CoronavirusUpdates
25th December, 6:00pm#NaToCorona pic.twitter.com/i2LZDfQmCf— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) December 25, 2021
आज कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नसला तरीही रुग्णसंख्येत झालेली वाढ ही चिंताजनक आहे. गेल्या आठवडाभरात मुंबईत कोरोना रुग्णसंख्येतली ही तिप्पट झालेली आहे. २० डिसेंबरला म्हणजेच सोमवारी शहरात २०४ नवीन रुग्ण सापडले होते, तीच संख्या आज ७५७ च्या घरात पोहचली आहे.
हे वाचलं का?
#CoronavirusUpdates
२० डिसेंबर, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण- २०४
२४ तासात बरे झालेले रुग्ण-२२४
बरे झालेले एकूण रुग्ण-७४६३२८
बरे झालेल्या रुग्णांचा दर-९७%एकूण सक्रिय रुग्ण-२०६१
दुप्पटीचा दर-२०९५ दिवस
कोविड वाढीचा दर (१३ डिसेंबर-१९ डिसेंबर)-०.०३%#NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) December 20, 2021
दरम्यान, राज्याचा विचार करायला गेला असता आज १ हजार ४८५ नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली असून त्यात दोन रुग्णांना ओमिक्रॉनची बाधा झाल्याचं कळतंय. राज्यात सध्याच्या घडीला ओमिक्रॉनची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या ११० वर पोहचली आहे. या ११० रुग्णांपैकी ५७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आज एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नसला तरीही राज्यभरात १२ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ९७.६८ टक्के आहे.
Omicron च्या पार्श्वभूमीवर राज्यात Lockdown लागणार? राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT