कोरोना संपला की CAA लागू होणार – अमित शहा
सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) अंमलबजावणीच्या दृष्टीकोनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महत्वाचं विधान केलं आहे. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर CAA कायदा लागू केला जाईल असं अमित शहा यांनी जाहीर केलं आहे. तीन दिवस पश्चिम बंगाल दौऱ्यावर असलेल्या अमित शहांनी हे विधान केलं आहे. तृणमुल काँग्रेस सध्या अशा अफवा पसरवत आहेत की CAA […]
ADVERTISEMENT
सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) अंमलबजावणीच्या दृष्टीकोनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महत्वाचं विधान केलं आहे. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर CAA कायदा लागू केला जाईल असं अमित शहा यांनी जाहीर केलं आहे. तीन दिवस पश्चिम बंगाल दौऱ्यावर असलेल्या अमित शहांनी हे विधान केलं आहे.
तृणमुल काँग्रेस सध्या अशा अफवा पसरवत आहेत की CAA कायदा लागू होणार नाही, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की कोरोना महामारीची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर CAA ची अंमलबजावणी केली जाईल. CAA हे देशाचं वास्तव होतं, हेच देशाचं वास्तव आहे आणि CAA हेच देशाचं वास्तव राहणार आहे…यात काही बदल होणार नाही असं शहा यांनी स्पष्ट केलं.
2019 साली संसदेत सुधारित नागरिकत्व कायदा संमत करण्यात आला. ज्यात पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील बिगर मुस्लीम व्यक्ती म्हणजेच हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारसी, ख्रिश्चन यांना भारतीय नागरिकत्व देण्यात येईल. 31 डिसेंबर 2014 च्या आधी आलेल्या बिगर मुस्लीम व्यक्तींना illegal immigrants म्हणून समजलं जाणार नाही. केंद्र सरकारच्या या कायद्याला भारतात बिगर भाजपशासित राज्यांकडून विरोध झाला. ज्यात पश्चिम बंगालचा समावेश होता.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
यावेळी बोलत असताना अमित शहांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर टीका केली. ममता दीदींना घुसखोरी हवी आहे, पण CAA हे वास्तव आहे, त्याची अंमलबजावणी केली जाईल. देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा अभेद्य करणे हे मोदी सरकारचे मूळ लक्ष्य असून, आम्ही आमच्या सैनिकांना सीमेवरील सुरक्षेसाठी जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचे काम करत आहोत.
ADVERTISEMENT