Nashik oxygen leakage: मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आर्थिक मदत

मुंबई तक

मुंबई: नाशिकच्या (Nashik) डॉ. झाकिर हुसैन रूग्णालयात ऑक्सिजनची गळती (Oxygen leakage) झाल्याने तब्बल 22 जणांचा दुर्दैवी मृत्यू (22 Patients Death) झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी प्रचंड दु:ख व्यक्त केलं आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी उच्च स्तरीय चौकशीचे आदेश देखील दिले आहेत. तसेच या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देखील जाहीर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: नाशिकच्या (Nashik) डॉ. झाकिर हुसैन रूग्णालयात ऑक्सिजनची गळती (Oxygen leakage) झाल्याने तब्बल 22 जणांचा दुर्दैवी मृत्यू (22 Patients Death) झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी प्रचंड दु:ख व्यक्त केलं आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी उच्च स्तरीय चौकशीचे आदेश देखील दिले आहेत. तसेच या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देखील जाहीर केली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून (CMO) मुख्यमंत्र्यांचा शोकसंदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे की, मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची आर्थिक मदत करण्यात येईल.

दुसरीकडे अशीही माहिती समोर आली आहे की, नाशिक महापालिकेच्या वतीने देखील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

‘माझी आई तडफडून मेली, अख्ख्या वॉर्डमधील सगळे पेशंट संपले’, नातेवाईकांचा आक्रोश

हे वाचलं का?

    follow whatsapp