Eknath Shinde: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोर्टाचा दणका, ‘ते’ भूखंड पडणार महागात?
CM Shinde is now in trouble: मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना जोरदार दणका दिला आहे. नागपूरमधील (Nagpur) झोपडपट्टीधारकांच्या आवास योजनेसाठी जे भूखंड (Plot) ताब्यात घेण्यात आले होते. जे 16 जणांना भाडेतत्वावर दिले असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आले आहे. ज्यानंतर कोर्टाने नागपूर इप्रूव्हमेंट ट्रस्टला (NIT) खडे […]
ADVERTISEMENT

CM Shinde is now in trouble: मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना जोरदार दणका दिला आहे. नागपूरमधील (Nagpur) झोपडपट्टीधारकांच्या आवास योजनेसाठी जे भूखंड (Plot) ताब्यात घेण्यात आले होते. जे 16 जणांना भाडेतत्वावर दिले असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आले आहे. ज्यानंतर कोर्टाने नागपूर इप्रूव्हमेंट ट्रस्टला (NIT) खडे बोल सुनावत भूखंड परत घेण्याचे निर्देश दिले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरुन या भूखंडाचे वाटप करण्यात आल्याचे याचिकेत म्हटलं आहे. (cm eknath shinde is dealt a big blow by court over nagpur plot shinde in trouble in plot case)
हा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असल्याने तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयाला न्यायप्रशासनातील हस्तक्षेप असल्याचे म्हणत कोर्टाने याप्रकरणी स्थगितीचे आदेश दिले आहेत.
एप्रिल 2021 मध्ये MVA सरकारच्या काळात नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी 5 एकर सरकारी जमीन 16 बिल्डर्संना अत्यंत कमी दरात भाडेतत्वावर दिली होती. ही जमीन झोपडपट्टीवासीयांसाठी घरे बांधण्यासाठी होती पण ती काही खासगी विकासकांना देण्यात आल्याचा आरोप एकनाथ शिंदेंवर करण्यात आला आहे.
खरं तर या जमिनीची मालिकी ही नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट म्हणजेच NIT कडे आहे. त्यामुळे आता न्यायालयाने हे प्रकरण अधिकाऱ्यांना यथास्थिती ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच राज्य सरकारलाही उत्तर सादर करण्यास सांगितले आहे.