गृहखाते ताब्यात असलेले NCP ‘मातोश्री’वर सुध्दा कॅमेरे लावतील, आमचा सल्ला उध्दव ठाकरेंनी ऐकला नाही: पाटील
दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर: राज्यातील गृहखातं शिवसेनेकडं यावं, अशी शिवसैनिकांची मागणी आणि अपेक्षा आहे. त्यावरून महाविकास आघाडीमध्ये नव्यानं कुरबुर सुरू झाली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यामध्ये ‘वर्षा’वर चर्चाही झाली. पण मी माझ्या सहकाऱ्यांच्या कामावर समाधानी आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे या सर्व घडामोडींवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी […]
ADVERTISEMENT

दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर: राज्यातील गृहखातं शिवसेनेकडं यावं, अशी शिवसैनिकांची मागणी आणि अपेक्षा आहे. त्यावरून महाविकास आघाडीमध्ये नव्यानं कुरबुर सुरू झाली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यामध्ये ‘वर्षा’वर चर्चाही झाली. पण मी माझ्या सहकाऱ्यांच्या कामावर समाधानी आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे या सर्व घडामोडींवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (1 मार्च) कोल्हापुरात भाष्य केलं.
‘राष्ट्रवादीला गृहमंत्रीपद देऊ नका, तो पक्ष खाण्यात मास्टर आहे. इतकंच नव्हे तर राष्ट्रवादीचे नेते प्रसंगी ‘मातोश्री’वर सुध्दा कॅमेरे लावतील.’ असं आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सांगितलं होतं. मात्र त्यांनी आपला सल्ला ऐकला नाही.’ असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहखात्यावरून वाद सुरू आहे. भाजपच्या नेत्यांवर कारवाई होत नसल्यानं, राष्ट्रवादीकडील गृहखातं शिवसेनेकडं यावं, अशी शिवसैनिकांची मागणी आहे. त्यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील संबंध ताणले गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता, त्यांनी मार्मिक प्रतिक्रिया दिली.
गृहखाते शिवसेनेनं आपल्याकडंच ठेवावं, असा सल्ला आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिला होता. मात्र त्यांनी तो ऐकला नाही, असा टोला चंद्रकांत पाटलांनी हाणला.









